Smita Patil च्या निधनानंतर Rekha च्या प्रेमात पडले होते Raj Babbar; तरीही तिच्याशी लग्न न करता पहिल्या पत्नीकडे का परतले?

Raj Babbar Rekha Relationship :  गेल्या काही दिवसांपासून राज बब्बर चर्चेत आहे. प्रतीक बब्बरने दुसरं लग्न केलं आणि या लग्नाला वडील राज बब्बरसह सावत्र बहीण भावाला आमंत्रण न दिल्यामुळे चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. राज बब्बर यांनी दोन लग्न केली होती. नादिरा आणि स्मिता पाटील, पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल स्मिता पाटील यांच्या निधनानंतर राज बब्बर हे रेखाच्या प्रेमात पडले होते.   

नेहा चौधरी | Updated: Feb 19, 2025, 04:14 PM IST
Smita Patil च्या निधनानंतर Rekha च्या प्रेमात पडले होते Raj Babbar; तरीही तिच्याशी लग्न न करता पहिल्या पत्नीकडे का परतले?

Raj Babbar Rekha Relationship : अभिनेते आणि राजकारणी राज बब्बर ग्लॅमरस जगापासून दूर असले तरी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. नुकताच प्रतीक बब्बर याने 14 फेब्रुवारीला दुसरं लग्न केलं. या लग्नाला प्रतीकने वडील राज बब्बरला बोलवलं नाही. त्यामुळे प्रतीक आणि राज बब्बर यांच्या नात्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे. प्रतीक हा स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा आहे. राज बब्बर यांचं पहिलं लग्न झालं असताना दोन मुलांचे वडील असताना ते स्मिता पाटील यांच्या प्रेमात पडले. या प्रेमातून प्रतीकचा जन्म झाला. पहिली पत्नी नादिराला जन्म न देता त्यांनी स्मिता पाटीलसोबत संसार सुरु केला होता. पण प्रतीकच्या जन्माच्या वेळी झालेल्या आरोग्यासंदर्भातील गुंतागुतीमुळे स्मिता पाटील यांचं निधन झालं. स्मिता पाटील यांच्या निधनानंतर तीन मुलांचा वडील राज बब्बर हा रेखा यांच्या प्रेमात पडला. हो, रेखा आणि राज बब्बर यांच्या लव्ह स्टोरीबद्दल गॉसिप कॉरिडॉरमध्ये खूप चर्चा होत्या. 

राज बब्बर आणि रेखा यांची पहिली भेट 'अगर तुम ना होते' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यावेळी रेखा अमिताभ बच्चन यांच्या ब्रेकअपमुळे त्रस्त होती. दरम्यान, राज बब्बर त्यांच्या दुसऱ्या पत्नी स्मिता पाटील यांच्या निधनाने शोक करत होते. अशा परिस्थितीत रेखाने राज बब्बर यांना खूप साथ दिली आणि यातूनच त्यांचं प्रेम अफेअर सुरू झाले. पण दोघांमधील नाते फार काळ टिकलं नाही. 

काही अफवा अशाही होत्या की, त्यांच्या नात्याचा शेवट हा चांगला झाला नाही. रेखा यांच्याशी अफेयर असताना अचानक काही काळानंतर स्मिता पाटीलच्या मृत्यूनंतर राज बब्बर त्याच्या पहिल्या पत्नी आणि मुलांकडे परतले. एका जुन्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं, 'मला स्मिताशी जितके प्रेम होते तितके रेखाशी नव्हतं. आमचं नातं तितक खोली नव्हतं. त्याच वेळी, आम्ही मित्र होतो असेही मी म्हणू शकत नाही.'

कोइमोईच्या रिपोर्टनुसार, जेव्हा रेखा आणि राज बब्बर यांचे ब्रेकअप झाले, तेव्हा अभिनेत्रीने घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल करण्यासाठी त्याच्याशी शेवटचे संभाषण केल्यानंतर पोलीस स्टेशनकडे जाताना रस्त्यावर अनवाणी धाव गेली होती. पण पोलिसांनी ते सामान्य जोडीदाराच्या भांडणासारखे हाताळले आणि त्यांना घरी पाठवलं.

राज बब्बर यांनी एका जुन्या मुलाखतीत रेखासोबतच्या त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं होतं की, 'हो, मी ते कधीच नाकारले नाही, शेवटी, मी देखील एक माणूस आहे. एक माणूस म्हणून, मला तिच्या कृतींबद्दल खूप आकर्षण वाटले. त्यावेळी स्मिता यांचं निधन झालं होतं आणि लोक तिचा गैरफायदा घेत होते. मात्र, रेखाने हे नाते कधीही स्वीकारले नाही.