सलमानच्या दमदार आवाजात रेस ३ चा पहिला प्रोमो लॉन्च...

 सलमान खानच्या प्रत्येक सिनेमाबद्दल त्याचे चाहते अत्यंत उत्सुक असतात.

Updated: Mar 15, 2018, 01:46 PM IST
सलमानच्या दमदार आवाजात रेस ३ चा पहिला प्रोमो लॉन्च... title=

मुंबई : सलमान खानच्या प्रत्येक सिनेमाबद्दल त्याचे चाहते अत्यंत उत्सुक असतात. मात्र रेस ३ मधील सलमानच्या लूकपासून प्रत्येक गोष्टीबद्दल चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. पण तुमची ही उत्सुकता काहीशी क्षमणार आहे. 

रेस ३ चा नवा प्रोमो

कारण सलमानच्या आवाजातील एक टीझर प्रोमो सलमाननेच रिलीज केला आहे. सिनेमाचा हा पहिला प्रोमो असून हा सलमानच्या आवाजात आहे.

यापूर्वी रेस च्या सिरीजमध्ये सैफ अली खान झळकला होता. आता मात्र रेस ३ मधील सलमानचा अंदाज पाहणे इंटरेस्टींग असणार आहे. सलमानच्या आवाजातील या नव्या प्रोमोमध्ये रेस सिरीजची सिग्‍नेचर ट्युनही ऐकू येईल. सलमानचा हा सिनेमा याचवर्षी ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित होईल.

पहा सिनेमाचा नवा प्रोमो...

 

सिनेमात या कलाकारांची वर्णी

रेस ३ मध्ये जॅकलिन फर्नांडिस आणि अनिल कपूर सोडून सलमान खानसोबत संपूर्ण टीम नवीन आहे. या सिनेमात बॉबी देओल, साकीब सलीम आणि डेझी शहा हे कलाकारही आहेत.