प्रियांका चोप्रानं स्वतःच लॉन्च केलेल्या रेस्त्रॉशी तोडलं नातं; पण का? येथे वाचा

Priyanka Chopra Sona : प्रियांका चोप्राचं सोना हे रेस्टॉरंट हे तिच्यामुळे सतत चर्चेत असतं. मात्र, प्रियांकानंं स्वत: सुरु केलेल्या रेस्त्रॉशी का तोडलं नातं? काय आहे त्याचं कारण काय हे जाणून घ्या... 

दिक्षा पाटील | Updated: Aug 17, 2023, 07:17 PM IST
प्रियांका चोप्रानं स्वतःच लॉन्च केलेल्या रेस्त्रॉशी तोडलं नातं; पण का? येथे वाचा title=
(Photo Credit : Social Media)

Priyanka Chopra Sona : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही सध्या तिच्या हॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. प्रियांकानं फक्त बॉलिवूडमध्ये नाही तर हॉलिवूडमध्ये देखील तिचं नाव कमावलं आहे. प्रियांका इथेच थांबली नाही तर त्यासोबत प्रियांकानं इतरही अनेक गोष्टींमध्ये स्वत: चं नाव केलं आहे. प्रियांका फक्त एक अभिनेत्री नाही तर त्यासोबत एक मुलगी, पत्नी, आई आणि त्यासोबतच एक बिझनेस वूमन देखील आहे. तिचे स्वत:चे अनेक व्यवसाय आहेत. तिनं न्यूयॉर्कमध्ये तिचं स्वत:च एक रेस्टॉरंट सुरु केलं होतं. त्या इंडियन रेस्टॉरंटला प्रियांकानं सोना असं नाव देखील दिलं होतं. रिपोर्ट्सनुसार, प्रियांकानं आता या रेस्टॉरंटमधील तिची पार्टनरशिप संपवली आहे. 

प्रियांकानं सोना हे रेस्टॉरंट मनीष के गोयल यांच्यासोबत सुरु केलं होते. ते दोघे या रेस्टॉरंटमध्ये पार्टनर होते. मनीष यांनी नुकतीच एका मॅगझीनला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी खुलासा केला की रेस्टॉरंटच्या क्रिएटिव्हिटीमध्ये प्रियांकाची मेहनत होती. तिनं दिलेल्या पाठिंब्याचे आणि पार्टनरशिपचे आम्ही आभारी आहोत. प्रियांका आता आमची क्रिएटिव्ह पार्टनर नाही. ती आता सोना फॅमिलीचा भाग नाही आहे आणि आम्ही आमच्या या नव्या चॅप्टरसाठी खूप उत्सुक आहोत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यावेळी त्यांच्या एका रिप्रेझेन्टिव्ह व्यक्तीनं सांगितलं की, सोनासोबत काम करणं, आणि त्याचा एक भाग असणं ही नेहमीच तिच्यासाठी एक मोठी गोष्ट असणार आहे. सोनापासून लांब झाल्यानं प्रियांकाला तिच्या आयुष्यात आणखी काय करायचं आहे त्याला संपूर्ण जगासमोर आणण्याची संधी मिळेल. तिचं हेअर कलर ब्रॅँड आणि एक प्रोडक्शन कंपनी देखील आहे. 

हेही वाचा : पती निक जोनसच्या कॉन्सर्टमध्ये प्रियांका चोप्रानं केलं असं काही... चर्चा तर होणारच

प्रियांकाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती नुकतीच सिटाडेल या सीरिजमध्ये दिसली होती. तिच्याजवळ काही हॉलिवूड प्रोजेक्ट्स देखील आहेत. प्रियांकाच्या बॉलिवूड करिअरविषयी बोलायचे झाले तर ती सगळ्यात शेवटी द स्काय इज पिंक या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर आता ती लवकरच जोया अख्तरच्या जी ले जरा या चित्रपटात दिसणार असे म्हटले जात होते. मात्र, आता प्रियांका या प्रोजेक्टचा भाग नाही अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, प्रियांका सध्या सतत पती निक जोनसच्या कॉन्सर्टमध्ये दिसते. कॉन्सर्टमधील तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.