VIDEO : लाईव्हचॅट दरम्यान प्रियंकाने असं काही केलं की...

एका लाईव्हचॅट दरम्यान निक आणि प्रियंकाची क्यूट स्टाईल थेट व्हिडिओच्या माध्यमातून दिसली आहे

Updated: Mar 13, 2021, 03:56 PM IST
 VIDEO : लाईव्हचॅट दरम्यान प्रियंकाने असं काही केलं की... title=

मुंबई: बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारी देसीगर्ल प्रियंका चोप्रा कामय चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ कायम सोशल मीडियावर व्हायरल होतात. तसचं प्रियंका आणि निक जोनासचे फोटो आणि व्हिडिओ पाहायला चाहते कायम उत्सुक असतात. असाच एक प्रियंका आणि निकचा किसींग व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. एका लाईव्हचॅट दरम्यान निक आणि प्रियंकाची क्यूट स्टाईल थेट व्हिडिओच्या माध्यमातून दिसली आहे, जी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

निक आणि प्रियांका नुकताच रिलीज झालेला नवीन अल्बम 'स्पेसमॅन'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. निक जोनास त्याच्या अल्बमबद्दल लाईव्ह चॅटद्वारे चाहत्यांशी गप्पा मारत होता आणि मग असं काहीतरी घडलं जे आता चर्चेत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडिओच्या मध्येच अचानक प्रियंका चोप्रा देखील कॅमेर्‍यासमोर आली. प्रियांका समोर येताच सगळ्यात आधी तिने चाहत्यांना हॅलो म्हणताना दिसली आणि त्यानंतर तिने निकला किस केलं आणि ताबडतोब तेथून निघून गेली.

लाईव्हचॅट दरम्यान प्रियंकाच माझी प्रेरणा असल्याचं निकने म्हटलं आहे. निक आणि प्रियंकाचे फोटो  सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. शिवाय त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.  मात्र क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच गाजतोय.

१ डिसेंबर २०१८ रोजी प्रियांका अमेरिकन पॉपस्टार निक जोनाससोबत लग्नबंधनात अडकली. बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील पॉप्युलर कपल पैकी हे एक कपल आहे. लवकरचं ती कल्पना चावला यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर 'द मॅट्रिक्स 4' हा हॉलिवूड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.