Raj Kundra UT 69 : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा गेल्या काही दिवसांपासून पॉर्न फिल्मबाबत चर्चेत आहे. याच प्रकरणावर आधारित 'UT69' हा सिनेमा घेऊन येत आहे. या सिनेमाच्या ट्रेलर लाँच दरम्यान राज कुंद्रा भावूक झाला होता. पाहा या प्रसंगाचा व्हिडीओ. राज कुंद्राने या ट्रेलर लाँच दरम्यान पहिल्यांदाच आपला मास्क काढला. मास्क काढल्यानंतर राज कुंद्रा भावूक झाला. 'मला बोला पण माझ्या बायकोला किंवा मुलाला बोलू नका,'या शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. यानंतर तो स्टेजवरच ओक्साबोक्शी रडू लागला.
ट्रेलरनुसार, ही कथा राजच्या आयुष्यावर आहे, हा चित्रपटासारखा बायोपिक नाही, पण ट्रेलर पाहून असे म्हणता येईल की हा राज कुंद्राचा 'द मास्क मॅन' चित्रपट आहे. जिथे राजचे तुरुंगातील जीवन नेमके दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ट्रेलरनुसार, तुरुंगातील लोक राजला 'पॉर्न किंग' म्हणताना दिसत आहेत. हा चित्रपट केवळ राजचा नसून लेखक तुरुंगातील लोकांबद्दल सांगत आहे. ट्रेलरच्या माध्यमातून कुठेतरी त्यांच्या समस्या दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
लोकांनी राजला 'पॉर्न किंग' आणि 'मास्क मॅन'चे टॅग दिले आहेत. असा प्रश्न विचारल्यावर राज म्हणाले, "काही लोकांचे बोलणे हे कामच आहे. लोकांनी सिंहाला गाढव म्हटले तर तो गाढव होत नाही.'
आपल्या यूटी 69 या चित्रपटाविषयी बोलत असताना राज कुंद्रा रडला आणि म्हणाला, "तुम्हाला जे पाहिजे ते मला बोला, पण माझ्या मुलांनो, माझ्या पत्नीवर आणि माझ्या कुटुंबाला बोलू नका, त्यांनी काहीही केलेलं नाही
राज कुंद्राने सांगितले की, शिल्पाने त्याला प्रत्येक पावलावर साथ दिली आहे आणि शिल्पाने कधीही राजबाबत गैरसमज करून घेतला नाही. राजच्या पाठीशी नेहमी शिल्पा खंबीरपणे उभी राहिली. आणि त्यांच्या कठीण प्रसंगी धीर दिला. कुठेतरी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ही त्यांची रणनीती होती, जर त्यांनी तो मुखवटा काढला असता, तर काही दिवसांनी लोक त्यांना विसरले असते, असे राज कुंद्रा यांनी सांगितले, परंतु लोकांच्या लक्षात राहावे म्हणून त्यांनी या चित्रपटासाठी मुखवटा घातला. राज कुंद्रा यापुढे मास्क घालणार नाहीत.