मुंबई : टीव्ही अभिनेत्री निया शर्मा तिच्या फोटोमुळे आणि व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असते. निया ही भारतीय टीव्हीच्या जगातील सर्वात बोल्ड अभिनेत्री मानली जाते. निया नेहमीच तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे आपल्या चाहत्यांना थक्क करते. निया शर्मा जितकी चांगली अभिनेत्री आहे, तितकीच ती एक उत्कृष्ट डान्सर देखील आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. आता तिने डान्सचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे.
नियाचा तुफान डान्स
या व्हिडीओमध्ये निया शर्माचा धमाकेदार डान्स दिसत आहे. ती कोरिओग्राफरला टक्कर देत नाचत आहे. तिचा डान्स आणि स्टेप्स पाहून शकीरालाही मागे टाकेल अशा अदा तिने या व्हिडीओमध्ये केल्या आहेत. या डान्स व्हिडीओमध्ये नियाचा उत्साह आणि उर्जा किती भरलेली आहे ती दिसत आहे.
6 मिलियन आहेत फॉलोअर्स या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये नियाने माहिती दिली आहे की, आता इन्स्टाग्रामवर तिचे 6 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिने लिहिले की, 'माझे 6 मिलियन पूर्ण झाले. #रिबेलचेलेंज', असं म्हणत तिने इमोजी देखील शेअर केला आहे.
असा आहे नियाचा लुक
या व्हिडिओमध्ये निया रेड कलर क्रॉप टॉप आणि ब्लॅक शॉट्समध्ये खूप सुंदर दिसत आहे. तिचे लांब मोकळ्या केसामुळे तिचा लुक परफेक्ट बनला आहे. तिचा हॉट लुक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.
लेस्बियन किसवर नियानं सोडलं मौन
नुकत्याच नियाच्या एका नवीन विधानामुळे खळबळ उडाली आहे. गेल्या काही वर्षांत आलेल्या 'ट्विस्टेड' वेबसीरिजच्या लेस्बियन किसविषयी नियाने आता आपले मौन सोडलं आहे. 'ट्विस्टडेट' या वेबसीरिजला रीलीज होऊन तीन वर्षांहून अधिक कालवधी झाला असला तरी निया शर्माच्या करियरमध्ये एक ट्विस्ट आणणारा या मालिकेतील एक सीन आजही चर्चेत आहे. या सिनमध्ये निया शर्मा आणि ईशा शर्मा किस करताना दिसत आहेत. या किसवरील एका मुलाखतीत निया शर्मा म्हणाली, 'सत्य हे आहे की, मी एका मुलीला किस करताना मला भीती वाटत होती. तो सीन केल्यानंतर मला आणखी जाणवलं की मुलीपेक्षा मुलाला किस करणं अधिक चांगलं आहे.
जमाई राजा 2.0 मध्ये दिसली निया निया शर्माने नुकताच रवी दुबेसोबत zee5 च्या मालिकेत 'जमाई राजा 2.0' मध्ये दिसली होती. तेव्हा देखील त्यांच्या किसिंगमुळे त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं.