‘रेड’ आणखी एक गाणं रिलीज, अजय आणि इलियानाची जबरदस्त Love Chemistry

अजय देवगन आणि इलियाना डिक्रूझ यांच्या आगामी ‘रेड’ या सिनेमातील आणखी एक गाणं रिलीज करण्यात आलं आहे. आधीच सिनेमाच्या ट्रेलरने आणि याआधी रिलीज झालेल्या गाण्याची सोशल मीडियात चर्चा रंगली आहे. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 20, 2018, 10:16 PM IST
‘रेड’ आणखी एक गाणं रिलीज, अजय आणि इलियानाची जबरदस्त Love Chemistry

मुंबई : अजय देवगन आणि इलियाना डिक्रूझ यांच्या आगामी ‘रेड’ या सिनेमातील आणखी एक गाणं रिलीज करण्यात आलं आहे. आधीच सिनेमाच्या ट्रेलरने आणि याआधी रिलीज झालेल्या गाण्याची सोशल मीडियात चर्चा रंगली आहे. 

‘नित खैर मंगा सोनिया मैं तेरी’ असे या गाण्याचे बोल असून रिलीज झाल्यावर काही वेळातच लाखोंनी हे गाणं पाहिलंय. हे एक पंजाबी लोकगीत असून ते नुसरत फतेह अली खान यांनी गायलंय. पण हे गाणं आता पुन्हा रिक्रिएट करण्यात आलंय. आता हे गाणं उस्ताद राहत फतेह अली खान यांनी गायलंय तर संगीत तनीष बागची याने दिलंय. 

‘रेड’ हा सिनेमा येत्या १६ मार्चला रिलीज होणार आहे. यात सिनेमात अजय देवगन लखनऊच्या इन्कम टॅक्स अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. यात त्याच्यासोबत सौरभ शुक्लाही दिसणार आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार, कृषण कुमार, कुमार मंगत आणि अभिषेक पाठक यांनी केलीये. तर या सिनेमाचं दिग्दर्शन राज कुमार गुप्ता यांनी केलंय.