'तुमच्या मुलाचं लग्न अशा मुलीशी कराल?' झीनत अमान यांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या सल्ल्यावर संतापल्या मुमताज

Mumtaz and Zeenat Aman : मुमताज यांनी झीनत अमान यांच्या लग्नाच्या आधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याच्या सल्ल्यावर त्यांची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 15, 2024, 12:33 PM IST
'तुमच्या मुलाचं लग्न अशा मुलीशी कराल?' झीनत अमान यांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या सल्ल्यावर संतापल्या मुमताज title=
(Photo Credit : Social Media)

Mumtaz and Zeenat Aman : काही दिवसांपूर्वी दिग्गज अभिनेत्री झीनत अमान यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितलं होतं लग्नाच्या आधी एकमेकांना समजून घेण्यासाठी लग्नाआधी एकत्र राहणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. आता दिग्गज अभिनेत्री मुमताज यांनी यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. तर या गोष्टीला सरळ नकार दिला आहे.

झूमला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा मुमताज यांच्याशी याविषयी विचारण्यात आलं तेव्हा त्या म्हणाल्या, "मी झीनतनं केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आहे. तुम्ही कितीही लिव्ह-इन मध्ये राहा, पण काय खात्री आहे की महिने लिव्ह-इन मध्ये राहिल्यानंतर त्यांचं वैवाहिक आयुष्य व्यवस्थित राहिल? मी तर म्हणते की लग्नच व्हायला नको. या वयात आणि काळात स्वत: ला बांधून ठेवण्याची काही गरज नाही. अरे, मुलांनो बाहेर जा, त्या व्यक्तीला शोधा जो तुमच्यासाठी बनला आहे. जग खूप पुढे जातंय. तुमच्या मुलीला या विश्वासासोबत मोठं करा की त्यांनी एक स्त्री असण्यासाठी कोणत्याही पुरुषाची गरज नाही. लग्न शेवटपर्यंत टिकवून ठेवावं लागतं." 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मुमताज यांचं म्हणणे आहे की "लिव्ह-इश रिलेशनशिपची बाजू घेणं योग्य नाही. एक समाज आणि एका राष्ट्राच्या रुपात, आपण त्यासाठी तयार नाही. झीनतला सावध रहायला हवं की ती लोकांना काय सल्ले देते. ती अचानक सोशल मीडियावर अशा गोष्टी बोलते आणि एक कूल काकू दिसण्यासाठी असलेली तिची उत्सुकता मी समजू शकते. फक्त तुमचे फॉलवर्स वाढवण्यासाठी आपल्या नैतिक मुल्यांना बाजूला ठेवून असा सल्ला देणं योग्य नाही."

हेही वाचा : एल्विशनं खरंच महागडी कार विकत घेतली की भाड्यानं? नेटकऱ्यांना आली वडिलांच्या वक्तव्याची आठवण!

पुढे याविषयी बोलताना मुमताज म्हणाल्या, "जर मुली लिव्ह-इनमध्ये राहण्याची संस्कृतीचा स्विकार करतील, तर लग्नाची परंपरा संपून जाईल. मला प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न त्या मुलीशी कराल जिच्या विषयी तुम्हाला माहित आहे की ती आधी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिली आहे? तुम्ही झीनतला एक उदाहरण म्हणून घ्या... ती लग्नाच्या अनेक वर्षांपासून मजहर खानला ओळखायची. त्यांचं लग्न नरकासारखं झालं होतं. त्यामुळे रिलेशनशिपवर सल्ला देणारी ती अखेरची व्यक्ती ठरायला हवी."