श्रीदेवीला टक्कर देत होती 'ही' अभिनेत्री, आता कामच मिळेना; फोटोतील चेहरा ओळखला?

Meenakshi Sheshadri: अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री ही एकेकाळी सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री होती. तिच्या सौंदर्यांनं आणि अभिनयानं तिनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. त्यामुळे तिची त्या काळी चांगलीच चर्चा रंगली होती. परंतु आज मात्र तिला काम मिळणंही मुश्किल झालं आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 30, 2023, 04:59 PM IST
श्रीदेवीला टक्कर देत होती 'ही' अभिनेत्री, आता कामच मिळेना; फोटोतील चेहरा ओळखला? title=
June 30, 2023 | meenakshi sheshadri is now not active in bollywood as she was a big competition to actress sridevi

Meenakshi Sheshadri: अभिनेत्रींमध्ये आपल्याला वेगळीच टक्कर पाहायला मिळते. त्यामुळे त्यांच्यातील स्पर्धेची तीव्रता आपल्या लक्षात येईलच. अनेक अभिनेत्री या आपल्यात आणि आपल्या अभिनेत्री मैत्रीणींमध्ये कधीच कोणतीच स्पर्धा नाही असंही म्हणताना दिसतात. त्यामुळे त्यांचीही अनेकदा चर्चा असते. 90 च्या काळात तर अभिनेत्रींमध्ये चांगलीच स्पर्धा रंगलेली पाहायला मिळाली आहे. त्याकाळी अनेक लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये झुंबड पाहायला मिळाली होती. श्रीदेवी ही 80 आणि 90 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होती. तिच्याची अनेक अभिनेत्रींची टक्कर लागलेली असायची. माधुरी दीक्षित, श्रीदेवी,, जूही चावला, उर्मिला मातोंडकर, करिश्मा कपूर अशा अनेक अभिनेत्री प्रचंड प्रमाणात लोकप्रिय होत्या. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे मिनाक्षी शेषाद्री. 

मिनाक्षी शेषाद्री हिची त्याकाळी जोरात चर्चा रंगलेली होती. तेव्हा अनेक मोठमोठ्या अभिनेत्रींना ती टक्कर देत होती. तिच्यासमोर श्रीदेवीसारख्या अभिनेत्रीही फिक्या पडू लागल्या होत्या. दामिनी या मालिकेनंतर तिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली होती. त्यामुळे तिच्या अनेकदा चर्चा रंगली होती. त्याकाळी हा सिनेमा प्रचंड गाजला होता. या सिनेमातील सनी देओल आणि मिनाषी शेषाद्रीची भुमिका प्रचंड गाजली होती. त्यामुळे हा चित्रपट आजही पाहिला जातो. या चित्रपटातील 'तारीख पे तारीख' हा डायलॉग प्रचंड गाजला होता. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. अशावेळी सर्वाधिक चर्चा रंगली ती मिनाक्षीच्या भुमिकेची. परंतु तुम्हाला माहितीये का की याच अभिनेत्रीला आज काम मिळणं मुश्किल झालं असून आता ती चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. 

1983 साली आलेल्या पेंटर बाबू या फिल्ममधून तिनं या क्षेत्रात पदार्पण केले होते. 17 व्या वर्षी तिनं मिस इंडिया ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर जॅकी श्रॉफ यांच्यासोबत आलेल्या चित्रपटातून तिला मोठ्या प्रमाणात स्टारडम मिळाले होते. त्यानंतर ऋषी कपूरसोबतच्या दामिनी या चित्रपटातून तिला वेगळी ओळखंही मिळाली होती. आता ती या क्षेत्रात सक्रिय नाही परंतु ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. परंतु आता ती चित्रपटात फारशी दिसत नाही. मध्यंतरी ती एका रिएलिटी शोमधून प्रेक्षकांच्या समोर आली होती. 

हेही वाचा - रामचरणच्या लेकीचे लाड पुरवतायत मुकेश अंबानी; तिला दिली सर्वात महागडी भेट!

तिनं ही इंडस्ट्री सोडल्यानंतर अमेरिकेतील एका इव्हेस्टर बॅंकरसह लग्न केले. मिनाक्षी ही फक्त उत्तम अभिनेत्रीच नाही तर ती एक उत्तम नृत्यांगनादेखील आहे. ती शास्त्रीय नृत्यातही पारंगत आहे. सध्या ती अमेरिकेतच सेटल झाली आहे.