कुटुंबियांची अब्रु चव्हाट्यावर; लोकप्रिय अभिनेत्रीचे वडिलांवर गंभीर आरोप...

Arthana Binu Allegations to Father Vijay Kumar: दाक्षिणात्त्य चित्रपटसृष्टीतून सध्या एक खळबळजनक बाब समोर येते आहे. अभिनेत्री अर्थना बिनू हिनं इन्टाग्रामवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात तिचे वडिल प्रॉपर्टीसाठी तिला धमकावता दिसत आहेत. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 5, 2023, 09:14 PM IST
कुटुंबियांची अब्रु चव्हाट्यावर; लोकप्रिय अभिनेत्रीचे वडिलांवर गंभीर आरोप...  title=
July 5, 2023 | Malayalam actress Arthana Binu posts a video on instagram showing how her biologial father is trespassing her home for property

Arthana Binu Allegations to Father Vijay Kumar:  दाक्षिणात्त्य अभिनेत्रींची सध्या सर्वत्रच क्रेझ आहे. त्यामुळे त्यांचे फॅन फॉलोवर्सही प्रचंड आहेत. परंतु दाक्षिणात्त्य चित्रपटसृष्टीतून एक खळबळजनक बातमी समोर येते आहेत. दाक्षिणात्त्य अभिनेत्री अर्थना बिनू हिनं आपल्या वडिलांवर अनेक तऱ्हेचे आरोप केले आहे. तिनं एक व्हिडीओ तिच्या इन्टाग्राम अकांऊटवरून पोस्ट केला आहे. ज्यात तुम्ही पाहु शकता की एक व्यक्ती तिच्या घरात शिरताना दिसत असून ती खिडकीतून आत घुसण्याचा प्रयत्न करते आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तिचे वडील आणि अभिनेते विजयकुमार आहेत. मंगळवारी तिनं हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामुळे याव्हिडीओवरून एकच खळबळ उडाली आहे. आईशी घटस्फोट झालेला असला तरीसुद्धा ही व्यक्ती आपल्या कुटुंबियांना त्रास देत असल्याचे तिनं म्हटलं आहे. 

सकाळी 9.45 च्या सुमारास आम्ही पोलीस स्टेशनला मदतीसाठी फोन करूनही आत्तापर्यंत कोणीही कारवाई केली नाही म्हणून मी ही पोस्ट शेअर करते आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती माझे वडील विजयकुमार आहेत जे मल्याळम चित्रपटांचील लोकप्रिय अभिनेते देखील आहेत. या व्हिडिओमध्ये ते मला सोबतच माझ्या आईला आणि माझ्या बहिणीला सुरक्षित ठेवण्यासाठी दहा वर्षांपूर्वी बंगल्याच्या बाहेर लावलेल्या सुरक्षा भिंतीवरून उडी मारून आमच्या निवासस्थानावर अतिक्रमण करू पाहत आहेत. माझे आईवडील हे कायदेशीररित्या घटस्फोटित आहेत तसेच माझी आई आणि माझी बहीण या दोघी माझ्या 85 वर्षीय आजीसोबत तिच्या माहेरी राहत आहेत. मीही त्यांच्यासोबत तिथेच राहते आहे. माझे वडिल वर्षानुवर्षे अशाप्रकारे अतिक्रमण करू पाहत आहेत आणि त्यांच्यावर त्यांच्या या कृतीमुळे अनेक पोलिस खटले दाखल आहेत. आज ते आमच्या कंपाऊंडमध्ये घुसले आणि दरवाजा बंद असल्याने ते उघड्या खिडकीतून आम्हाला धमकावत होते. माझ्या बहिणीला आणि आजीला जीवे मारण्याची धमकी देताना मी ऐकले, असं तिनं या पोस्टमधून लिहिलं आहे. 

ती पुढे म्हणते की, त्यांनी मला चित्रपटातील अभिनय थांबवण्याचा इशारा दिला होता आणि मी न पाळल्यास कोणत्याही थराला जाईन अशी धमकीही मला दिली. मला अभिनय करायचा असेल तर मी तो म्हणेल त्या चित्रपटात करावा लागेल असेही ते म्हणाले. ते खिडकीला हात लावून ओरडत राहिले. त्यांनी माझ्या आजीवरही वाट्टेल ते आरोप केले. मी नुकतेच शूटिंग पूर्ण केलेल्या माझ्या मल्याळम चित्रपटाच्या टीमलाही त्यांनी वाईट भाषेत ऐकवले आहे. हे सर्व प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून घडत आहेत. माझ्या आणि आईच्या कामाच्या ठिकाणी अतिक्रमण करणे, घुसखोरी करणे आणि समस्या निर्माण करणे तसेच माझ्या आईच्या कामाच्या ठिकाणी आणि बहिणीच्या शाळेत अराजक निर्माण करणे या विरुद्ध न्यायालयात खटला चालू आहे.''

हेही वाचा - सलमान खानच्या ऑनस्क्रीन हिरोईननं दिला गोंडस बाळाला जन्म... फोटो केला शेअर

पुढे ती म्हणते की, ''मी माझ्या इच्छेनुसारच चित्रपटांमध्ये काम करत आहे. अभिनय ही माझी नेहमीच आवड आहे आणि जोपर्यंत माझी तब्येत मला परवानगी देईल तोपर्यंत मी अभिनय करत राहीन. जेव्हा मी मल्याळम चित्रपटात काम करते तेव्हा त्यांनी मला अभिनय करण्यापासून रोखण्यासाठी केस दाखल केली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मी जेव्हा श्यालॉकमध्ये काम केले तेव्हाही त्यांनी कायदेशीर केस दाखल केली आणि हा चित्रपट चालला जाऊ नये म्हणून मला अधिकृत कायदेशीर दस्तऐवजावर स्वाक्षरी करावी लागली की मी माझ्या इच्छेने चित्रपटात काम केले आहे. लिहिण्यासारखे बरेच काही आहे परंतु मथळ्यासाठी शब्द मर्यादा मला परवानगी देत ​​​​नाही. त्यांच्याविरुद्ध एक खटलाही चालू आहे जो त्याने माझ्या आईचे देणे असलेले पैसे आणि सोने परत मिळवण्यासाठी दाखल केले होते.''