मलायका अरोराचा बोल्ड लूक आणि ट्रान्सपरंट ड्रेसमुळेमुळे ट्रोल, पाहा VIDEO

अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या बोल्ड लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Updated: Jul 4, 2022, 05:35 PM IST
मलायका अरोराचा बोल्ड लूक आणि ट्रान्सपरंट ड्रेसमुळेमुळे ट्रोल, पाहा VIDEO

मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री मलायका अरोराची स्टाईल नेहमीच चर्चेत असते. ती नेहमीच अतिशय बोल्ड लूकमध्ये दिसते. त्यामुळे ती कुठे ही गेली तरी संपूर्ण लाइमलाइट लुटते. रविवारी मलायका अरोरा मिस इंडिया 2022 कार्यक्रमात पोहोचली होती. या वेळी तिचा लूक आणि सिझलिंग स्टाइलची सर्वत्र चर्चा होती. पण तिच्या ड्रेसमुळे ती सोशल मीडियावर ट्रोल झाली.

मलायका अरोरा मिस इंडिया 2022 स्पर्धेत गोल्डन कलरचा ट्रान्सपरंट ड्रेस घालून पोहोचली होती. मलायकाचा ड्रेस पूर्णपणे सी-थ्रू आहे. मलायका तिच्या ड्रेसमुळे ट्रोल झाली.

मिस इंडिया इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या मलायकाने तिच्या गोल्डन ड्रेसमध्ये मेकअप मात्र अगदी साधा ठेवला होता. स्टायलिश हेअरस्टाईल तिच्या लूकमध्ये आकर्षण वाढवत होती.

मलायकाच्या लूकबद्दल तुम्हाला काय वाटते? तुम्ही कमेंट करु शकता.