'किती ही गरिबी....', म्हणत नेटकऱ्यांकडून बॉलिवूड अभिनेत्री ट्रोल

नेटकऱ्यांकडून बॉलिवूड अभिनेत्री ट्रोल   

Updated: Jul 31, 2019, 02:25 PM IST
'किती ही गरिबी....', म्हणत नेटकऱ्यांकडून बॉलिवूड अभिनेत्री ट्रोल  title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये 'राज - रिबूट' या चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री क्रिती खरबंदा ही सध्या चर्चेत आली आहे. यावेळी ती चर्चेत आहे ते म्हणजे काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या काही फोटोंमुळे. सोशल मीडियावर सहसा सेलिब्रिटी त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. कित्येकदा ते चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. पण, जास्तीत जास्त वेळा सेलिब्रिटी ट्रोलच होतात. यावेळी क्रितीलाही अशाच परिस्थितीला सामोरं जावं लागलं आहे. 

 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Stunner @kriti.kharbanda #Pretty #Princess #KritiKharbanda #Sunshine #Gorgeous #Beautiful #Cutie #HappyWeekend

A post shared by Kriti Kharbanda Official FC (@kritikfc) on

 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Rocking the ripped Jeans!@kriti.kharbanda #Pretty #Princess #KritiKharbanda #Sunshine #Gorgeous #Beautiful #Cutie #HappyWeekend #Sunday #Weekend #Bollywood #SundayFunday #Sundayvibes #Stunner

A post shared by Kriti Kharbanda Official FC (@kritikfc) on

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये क्रितीने फिकट निळ्या रंगाची कलरची जीन्स घातली असून तिच्या या पेहरावावरून नेटकरी तिला ट्रोल करताना दिसत आहेत. विशेषत: क्रितीची रिप्ड जीन्स पाहून नेटकरी तिला नाना प्रकारच्या कमेंट्स देत आहेत. 
कापड फायल्याप्रमाणे दिसणारी ही जीन्स पाहत एका नेटकऱ्याने म्हटले आहे की,‘इतका पैसा कमवून काय फायदा....? तर एकाने तिला चक्क भिकारीही म्हटले आहे. काही युजर्सनी हा फोटो बघत, ‘पाहा, किती ही गरिबी.... ,’ अशा काही प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

 

कपड्यांवरुन खिल्ली उडवणाऱ्या या मंडळींना आता ती काय उत्तर देते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, विविधभाषी चित्रपट विश्वांत नावारुपास आलेली ही अभिनेत्री हिंदी कलाजगतातही तिचं वेगळं स्थान बनवून आहे. 'शादी में जरूर आना', 'यमला पगला दीवाना... फिर से', 'गेस्ट इन लंडन' अशा अनेक बॉलिवूड चित्रपटात तिने काम केले आहे. येत्या काळात ती 'हाऊसफुल 4' या चित्रपटातून झळकणार असून, 'पागलपंती' मध्येही तिचा अभिनय पाहता येणार आहे.