कतरिनानं Alia ला शिकवला असा धडा, वेदना होत असूनही केलं दुर्लक्ष, पाहा Video

कतरिना कैफ तिच्या पहिल्या करवा चौथची तयारी करत आहे. तर आलिया भट्ट  लवकरच एक आनंदाची बातमी देणार आहे. असं असताना कतरिना आणि आलियाचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Updated: Oct 11, 2022, 01:53 PM IST
कतरिनानं Alia ला शिकवला असा धडा, वेदना होत असूनही केलं दुर्लक्ष, पाहा Video title=

Katrina Kaif Alia Bhatt Throwback Video: कतरिना कैफ तिच्या पहिल्या करवा चौथची तयारी करत आहे. तर आलिया भट्ट  लवकरच एक आनंदाची बातमी देणार आहे. असं असताना कतरिना आणि आलियाचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कतरिना कैफनं इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. बॉलिवूड तारका कतरिना कैफ आणि आलिया भट्ट या दोघीही त्यांच्या फिटनेससाठी ओळखल्या जातात.  या व्हिडीओत कतरिना कैफ जिम ट्रेनरची भूमिका बजावताना दिसत आहे. कतरिना कैफनं आलिया उठाबशा काढण्यास सांगितल्या आणि ती मोजताना दिसत आहे. यावेळी आलिया भट्टला जबरदस्त वेदना होत असल्याचं दिसत आहे. 

कतरिनानं हा व्हिडीओ 29 ऑक्टोबर 2017 ला शेअर केला होता. या व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना कतरिनानं लिहिलं होतं की, "तू खूप चांगलं करतेस आलिया. काळजी करू नका फक्त 300 उठाबश्याच मारायच्या आहेत."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आलिया भट्ट तिच्या अपकमिंग फिल्म 'डार्लिंग'च्या प्रमोशनसाठी व्यस्त आहे. आपलं फिटनेस कायम ठेवण्यासाठी आलिया भट्ट रोज लाइट वर्कआउट आणि योगासनं करते. त्याचबरोबर रणबीर कपूर तिच्या डायटकडे विशेष लक्ष देतो.