कंगना राणावतचं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत! यावेळी 'कांतारा' चित्रपटावर साधला निशाणा, चक्क केली स्तुती कारण

कन्नड चित्रपट कांताराला आतापर्यंत अनेकांची प्रशंसा मिळाली आहे. नुकतीच कंगना राणावतची प्रतिक्रिया आली आहे. चित्रपट पाहून परतल्यानंतर कंगनाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच व्हिडीओसोबत तिनं एक पोस्ट देखील शेअर केली आहे. कांताराला पुढील वर्षी भारताकडून ऑस्करसाठी प्रवेश मिळावा, असे म्हटले आहे. कंगनाने दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचे जोरदार कौतुक केले. 

Updated: Oct 21, 2022, 10:37 PM IST
कंगना राणावतचं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत! यावेळी 'कांतारा' चित्रपटावर साधला निशाणा, चक्क केली स्तुती कारण title=

kanagana ranaut reacted on kantanra: सध्या कांतारा (Kantara) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. आता हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. संपुर्ण भारतात या चित्रपटाने नुसता धुमाकूळ घातला आहे. बॉ़लीवूड अभिनेत्री कंगना राणावतनंही हा चित्रपट पाहिला आहे. हा चित्रपट पाहून कंगनानं धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. (Kanagana Ranaut on Kantara) तिच्या म्हणण्यानूसार हा चित्रपट पाहून ती थरथरत कापते आहे आणि निदान आठवडाभर तरी ती यातून बाहेर पडेल असं वाटतं नाही. (kanagana ranaut reacted on kantanra film says the film has effected me a lot)

कन्नड चित्रपट कांताराला (Kanatara Box Office Collection) आतापर्यंत अनेकांची प्रशंसा मिळाली आहे. नुकतीच कंगना राणावतची प्रतिक्रिया आली आहे. चित्रपट पाहून परतल्यानंतर कंगनाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच व्हिडीओसोबत तिनं एक पोस्ट देखील शेअर केली आहे. कांताराला पुढील वर्षी भारताकडून ऑस्करसाठी प्रवेश मिळावा, असे म्हटले आहे. कंगनाने दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचे (Rishbh Shetty) जोरदार कौतुक केले. 

आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे

कांतारा चित्रपटाला जबरदस्त माऊथ पब्लिसिटी मिळत आहे. या चित्रपटाची लेटेस्ट फॅन कंगना राणावत (Kangana Ranuat on Instagram) आहे. गुरुवारी संध्याकाळी ती चित्रपट पाहण्यासाठी आली होती. यानंतर तिनं चित्रपटाचं कौतुक करताना एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये कंगना म्हणाली की, मी कांतारा नावाचा चित्रपट पाहून आली आहे. हा किती आश्चर्यकारक अनुभव आहे, रिषभ शेट्टी तुला सलाम. तुमच्यासारख्या लोकांमुळे चित्रपट घडतात. मी थिएटरमध्ये अनेक लोकांना असे काही याआधी आम्ही पाहिले नव्हते असे म्हणताना ऐकले. मला वाटत नाही की मी आठवडाभर तरी या चित्रपटाच्या प्रभावाखाली राहणार आहे. 

आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'

आणखी एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये कंगनाने लिहिले की, "मला वाटतं कांताराला पुढच्या वर्षी ऑस्करमध्ये प्रवेश मिळावा, मला माहित आहे की एक वर्ष अजून बाकी आहे आणि आणखी चांगले चित्रपट येऊ शकतात." पण ऑस्करपेक्षाही जगभर भारताचे प्रतिनिधित्व योग्य पद्धतीने व्हायला हवे हे महत्त्वाचे आहे.