मुंबई : मनोरंजन विश्वातील कलाकारंचे दरवर्षी विविध पुरस्कारांनी कौतुक केले जाते. असाच एक सोहळा म्हणजे फिल्मफेअर पुरस्कार. मराठी सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा मराठी फिल्मफेअर पुरस्कार 2018 चा सोहळा संपन्न झाला. यामध्ये अनेक मराठी कलाकारांना आणि कलाकृतीला सन्मानित करण्यात आलंय यामध्ये 'कच्चा लिंबू' या सिनेमाला सर्वोत्कृष्ठ सिनेमाचा पुरस्कार मिळाला. तर अमेय वाघने 'मुरांबा' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. तर सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री म्हणून 'कच्चा लिंबू'मधील सोनाली कुलकर्णीला मिळाला.
सर्वोत्कृष्ट चित्रपट : कच्चा लिंबू
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : प्रसाद ओक- कच्चा लिंबू
सर्वोत्कृष्ट अभिनेता : अमेय वाघ - मुरांबा
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : सोनाली कुलकर्णी (कच्चा लिंबू)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : गिरीश कुलकर्णी- फास्टर फेणे
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: चिन्मयी सुमीत-मुरांबा
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक) - इरावती हर्षे- कासव
सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक) - शशांक शेंडे- रिंगण
सर्वोत्कृष्ट चित्रपट(क्रिटिक)- शिवाजी लोटण पाटील- हलाल
सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक : वरूण नार्वेकर- मुरांबा,मकरंद माने-रिंगण
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता : अभिनय बर्डे- ती सध्या काय करते
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री : मिथिला पालकर- मुरांबा
सर्वोत्कृष्ट गायिका : अनुराधा कुबेर- माझे तुझे (मुरांबा)
सर्वोत्कृष्ट गायक : आदर्श शिंदे - विठ्ठला(रिंगण)
सर्वोत्कृष्ट गीतकार: संदीप खरे- माझे आई बाबा (कच्चा लिंबू)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार : साहिल जोशी- रिंगण
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी : अमलेन्द्रू चौधरी -हंपी
सर्वोत्कृष्ट संवाद : वरूण नार्वेकर- मुरांबा
सर्वोत्कृष्ट स्क्रिनप्ले : क्षितीज पटवर्धन-फास्टर फेणे
सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाइन : निखील कोवळे- फास्टर फेणे
सर्वोत्कृष्ट कथा : मकरंद मान- रिंगण
सर्वोत्कृष्ट नृत्य : फुलवा खामकर- अपने ही रंग में(हंपी)
फिल्म फेअर मराठी पुरस्कार सोहळ्यात पंडित ह्रदयनाथ मंगेशकरांना 'जीवन गौरव' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. तसेच 'हलाल' या सिनेमाला समिक्षकांनी सर्वोत्कृष्ठ सिनेमा ठरवला. तर 'कासव' सिनेमासाठी इरावती हर्षे आणि 'रिंगण' सिनेमातील शशांक शेंडे यांना सर्वोत्कृष्ठ कलाकार म्हणून गौरवण्यात आलं. दिल दोस्ती दुनियादारी फेम सुव्रत जोशी आणि अमेय वाघ यांनी पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन केले.