मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खान सध्या न्यूरो इंडोक्राईन कॅन्सरशी झुंज देतोय. १६ मार्च रोजी ट्विट करून खुद्द इरफाननंच ही माहिती त्याच्या फॅन्सला दिली होती. सध्या लंडनच्या एका रुग्णालयात इरफान उपचार घेतोय. काही दिवसांपूर्वी एक पत्रातूनही इरफाननं आपली व्यथा मांडली होती. इरफानच्या या पत्रामुळे मात्र त्याच्या फॅन्सला त्याची आणखीनच काळजी वाटू लागली होती. परंतु, आता मात्र इरफानची तब्येत सुधारत असल्याची माहिती मिळतेय.
एका एन्टरटेन्मेंट वेबसाईटशी बोलताना, लंडनहून परतलेला इरफानचा एक मित्र आणि सिनेनिर्मात्यानं इरफानच्या प्रकृतीविषयी माहिती दिलीय. धीम्या गतीनं का होईना पण, इरफानच्या तब्येतीत सुधारणा होतेय. या बातमीमुळे नक्कीच इरफानच्या फॅन्सना दिलासा मिळणार आहे.
अतिशय धीम्या गतीनं का होईना पण इरफानची तब्येतीत सुधारणा होतेय. सगळं काही सुरळीत राहीलं तर वर्षाच्या अखेरीपर्यंत इरफान भारतात परतू शकतो.
इरफानचे तीन सिनेमे प्रदर्शनाच्या तयारीत आहेत. यामध्ये कारवां आणि द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स या दोन सिनेमांसहीत 'पजल' या हॉलिवूड सिनेमाचाही समावेश आहे.