Huma Qureshi प्रेग्नंट? बेबी बंप पाहताच नेटकऱ्यांमध्ये एकच चर्चा

Huma Qureshi Pregnant च्या चर्चा तिच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे झाल्या आहेत. हुमा कुरेशीच्या त्या व्हिडीओनं एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, सत्य काय आहे हे अजून समोर आलेले नाही. तर दुसरीकडे नेटकरी तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत तिच्या प्रेग्नंसी विषयी बोलत आहेत.   

Updated: Feb 26, 2023, 03:13 PM IST
Huma Qureshi प्रेग्नंट? बेबी बंप पाहताच नेटकऱ्यांमध्ये एकच चर्चा title=

Huma Qureshi Pregnant : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. हुमा कुरेशी सध्या तिच्या 'डबल एक्सएल' (Double XL) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हुमाचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर हुमा सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत हुमा चाहत्यांच्या संपर्कात राहते. हुमा बऱ्याचवेळा तिच्या पोस्टमुळे चर्चेचा विषय ठरते. कधी तिची एखादी पोस्ट असते तर कधी तिच फोटो. नुकताच हुमा कुरेशीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी हुमा प्रेग्नंट आहे असे म्हटले आहे. 

हुमाचा हा व्हिडीओ इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हुमानं या व्हिडीओत जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे. तिची ही स्टायलीश साडी चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, सगळ्यांचे लक्ष हे हुमाच्या पोटानं वेधले आहे. तिचं वाढलेलं पोट पाहून अनेकांनी प्रश्न केला आहे की हुमा प्रेग्नंट आहे का? एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ती प्रेग्नंट आहे का? दुसरा नेटकरी म्हणाला की मला वाटतंय ती प्रेग्नंट आहे. तिसरा म्हणाला, ही जाड झाली आहे की प्रेग्नंट आहे. आणखी एक नेटकरी म्हणाला, ही कोणत्या जगात राहते. अभिनेत्री असूनही फीगर मेन्टेन करत नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शिखर धवन आणि हुमा कुरेशी 'डबल एक्सएल' चित्रपटात

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून हुमा कुरेशी ही भारतीय क्रिकेटर शिखर धवनसोबत (shikhar dhawan) रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्याचे कारण म्हणजे सगळ्यात आधी शिखर धवन आणि हुमा कुरेशी हे दोघे एकत्र 'डबल एक्सएल' या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात शिखर धवननं पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. चित्रपटात हुमा आणि शिखरनं एकत्र डान्स केला होता. तर याच चित्रपटातून शिखरनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. 

हेही वाचा : अश्लील व्हिडीओनंतर Gautami Patil चा पुन्हा एक नवा VIDEO समोर, पाहून चाहते हैराण

काही दिवसांपूर्वी हुमा आणि शिखर धवनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत हुमा कुरेश शिखर धवनला पंजाबीमध्ये फोनवर बोलते की आपण लग्न करू शकत नाही? यावर शिखर धवनने उत्तर देत विचारले की, का… उद्या आपलं लग्न आहे. तेव्हा हुमा कुरेशी म्हणते, अरे! चुकून तुला फोन लागला काय.