सलमान खानच्या Girlfriend वर भर रस्त्यात ओढावला भयानक प्रसंग, व्हिडिओ व्हायरल

सलमान खानच्या गर्लफ्रेंडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Updated: Nov 23, 2021, 05:59 PM IST
सलमान खानच्या Girlfriend वर भर रस्त्यात ओढावला भयानक प्रसंग, व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : सलमान खानच्या खास  व्यक्तीबद्दल बोलायचं झालं तर पहिला क्रमांक येतो तो म्हणजे युलिया वंतूरचा. जिच्याबद्दल असंही मानलं जात होतं की, ती देखील सलमानची  गर्लफ्रेंड होती. मात्र ही गोष्ट सलमान आणि युलियाने कधीच मान्य केली नाही. दरम्यान, युलियाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही मुली तिला त्रास देताना दिसत आहेत.

युलिया दिला त्रास
लोकांच्या गाड्यांमागे लहान मुले वस्तू विकताना पाहणं नवीन नाही. यावेळी सलमान खानची  गर्लफ्रेंड  युलिया वंतूर अशा मुलींच्या कचाट्यात अडकली. काही मुली तिच्या गाडीच्या मागे लागल्या आणि तिला टिश्यू विकण्याचा प्रयत्न करू लागल्या. युलियाला काहीच समजत नव्हतें, तोपर्यंत तिच्या ड्रायव्हरने कार सुरु केली.  ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. बहुतेक लोक युलियाच्या बाजूने आहेत आणि विक्रेत्यांना चुकीचं सांगत आहेत.

लोक टिश्यू विकण्याचा प्रयत्न करत होते
युलिया वंतूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये युलिया कारच्या आत असून काही मुली तिला टिश्यू विकण्याचा प्रयत्न करत आहेत. मुली म्हणत आहेत, दीदी, त्या आम्ही नव्हतो. ज्यावर हा व्हिडीओ पाहणाऱ्या एका फॉलोअरने अंदाज लावला आहे की, कदाचित युलिया वंतूरने याआधी काही पैसे दिले असावेत. या मुलींना पुन्हा पाहून त्यांचा भ्रमनिरास होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

युलियाचा ड्रायव्हरने गाडी पळवली
त्याचवेळी एक मुलगी गाडीच्या काचेच्या आत हात घालून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. दरम्यान, युलिया वंतूरचा ड्रायव्हर गाडी पळवतो, तरीही ती गाडी धरून थोडा वेळ पळताना दिसते. व्हिडिओ पाहून लोक फक्त मुलींचीच चूक सांगत आहेत. त्या मुलींना असे पाहून युलियाची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.