Dara Singh in Ramayan: आज हनुमान जयंती (Hanuman Jayanti 2023) आहे त्यामुळे आज देशभरात हनुमान जयंतीचा उत्साह आहे. हनुमानाची भुमिका छोट्या आणि मोठ्या पडद्यावर अनेक नामवंत कलाकारांनी साकारली (Hanuman Role in Ramayan) आहे. त्यांच्या भुमिकेला प्रेक्षकांचे, चाहत्यांचे प्रेम मिळाले आहे. अशी एक भुमिका गाजली होती ती म्हणजे अभिनेते दारा सिंग (Dara Singh as Hanuman in Ramayan) यांनी रामायण या मालिकेत केलेली हनुमानाची भुमिका. तेव्हा त्यांची ही भुमिका इतकी गाजली होती की त्यांचे फोटो लोकं त्यांच्या घरी फ्रेम करून लावायला लागले आणि त्यांची पूजा करू लागले तसेच त्यांना पाहताच क्षणी त्यांच्या पायाही पडू लागले. (hanuman jayanti special when dara singh had left eating non veg while shooting ramayan know the full incident entertainment news in marathi)
टेलिव्हिजन (Television) क्षेत्र हे असे क्षेत्र आहे जिथे प्रत्येक कलाकाराला प्रचंड लोकप्रियता मिळते. प्रेक्षक अक्षरक्ष: अशा भुमिका हे डोक्यावर घेतात. त्यांच्या भुमिकांची ही तूफान चर्चा होते. रामायण या मालिकेनं ही किमया चाळीस वर्षांपुर्वी करून दाखवली होती. या मालिकेतील सर्वच पात्र गाजली होती. लॉकडाऊनमध्ये (Ramyan Full Episodes) जेव्हा ही मालिका टेलिव्हिजनवर दाखवली होती तेव्हा ही मालिका अक्षरक्ष: 40 कोटींच्या वर लोकांनी पाहिली होती.
रामायण या मालिकेतील दारा सिंग यांनी साकारलेली हनुमानाची (Dara Singh Left Non Veg) भुमिका प्रचंड गाजली होती. त्यावेळी प्रेक्षक अक्षरक्ष: त्यांचे फोटो हे घरी लावायचे आणि त्यांची पूजा करायचे. दारा सिंग कुठे प्रत्यक्ष भेटले तर त्यांच्या पायाही पडणारे अनेक लोकं होते परंतु दारा सिंग अशा लोकांना थांबावयचे. परंतु प्रेक्षकांचे इतके प्रेम पाहून दारा सिंग अक्षरक्ष: भारावून गेले होते. त्यांनी यामुळेच मासांहार सोडला होता, असे मीडिया रिपोर्ट्समधून कळते.
दारा सिंग यांचा मुलगा वीरू दारा सिंग (Viru Dara Singh) यानं कोईमोईला दिलेल्या एका मुलाखतीत असं सांगितले होते की, ''माझ्या वडिलांनी रामायण मालिकेचे शूटिंग सुरू असताना नॉनव्हेज खाणं सोडलं होतं. नाश्ता केल्यानंतर ते एक तास तरी आपल्या भुमिकेची तयारी करायचे. पुर्ण दिवस ते फार काहीच खायचे नाही तर दुपारी जेवताना ते नारळाचे पाणी नाहीतर कुठलंतरी ज्यूस प्यायचे''. रामायण या मालिकेनं अभिनेते दारा सिंग यांनी वेगळी ओळख प्राप्त करून दिली. रामायणासोबतच त्यांनी अशा अनेक चित्रपटांमधून भुमिका साकारल्या आहेत ज्यात त्यांच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले आहे. त्याचा मुलगा वीरू दारा सिंगही अभिनय क्षेत्राशी संलग्न आहे.
आजही 'रामायण' ही मालिका आवडीनं पाहिली जाते. या मालिकेतील पात्र ही आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.