गोविंदाने लहान वयाच्या अभिनेत्रीसोबत काय केलं? युजर्स म्हणाले, थांबाsss

लहान वयाच्या अभिनेत्रीसोबत केलेल्या गोष्टीमुळे गोविंदा ट्रोल..   

Updated: Dec 3, 2021, 04:06 PM IST
गोविंदाने लहान वयाच्या अभिनेत्रीसोबत काय केलं? युजर्स म्हणाले, थांबाsss title=

मुंबई : अभिनेता गोविंदाने त्याच्या आगामी म्युझिक व्हिडीओचा टीझर रिलीज केला आहे. या गाण्याचे बोल 'चष्मा चड्ढा के' आहेत. हे गाणे सोमवारी रिलीज होणार आहे. या व्हिडीओमध्ये गोविंदा आणि शनाया कौर डान्स करताना दिसत आहेत. सर्वात शेवटी गोविंदा 'रंगीला राजा' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला.  आता तो एक नवीन म्युझिक व्हिडिओ घेऊन येत आहे.

गोविंदा ज्या गाण्याच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे त्या गाण्याचे बोल आहेत 'चष्मा चढा के'. गाण्याचं टीझर रिलीज करण्यात आला आहे. 30 सेकंदांच्या क्लिपमध्ये गोविंदा पिवळ्या लॅम्बोर्गिनीमधून उतरताना दिसत आहे. तरुण अभिनेत्री शनाया कौरसोबत  90 च्या दशकातील स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Govinda (@govinda_herono1)

तो एका यॉटवर डान्स करत आहे. व्हिडीओ शेअर करत गोविंदाने लिहिले आहे, 'हॅलो. मित्रांनो, माझे दुसरे गाणे चष्मा चढ्ढा के 6 डिसेंबर 2021 रोजी रिलीज होणार आहे. मला आशा आहे की तुम्हाला ते आवडेल.'' यासह त्याने अनेकांना टॅग केले आहे.

सोशल मीडियावर अनेकांनी गोविंदाला शुभेच्छा दिल्या तर काहींनी मात्र गोविंदाला त्याच्या वयामुळे ट्रोल केलं. एक युझर म्हणाला 'काका...' तर दुसरा म्हाणाला 'आम्ही तुझ्या नव्या गाण्याची प्रतीक्षा करत आहोत...' सध्या गोविंदाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.