मुंबई : आतापर्यंत आपण स्त्रीया किंवा मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना कानावर पडतात. मात्र एका गरोदर बकरीवर 8 लोकांनी गँगरेप केल्याची घटना देशात घडली आहे. या घटनेमुळे सगळीकडेच अस्वस्था आहे. ही घटना हरियाणातील मेवाट या ठिकाणी घडली आहे. जेव्हा बकरी मालकाने याबाबत तक्रार दाखल केली तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला. मिळालेल्या माहितीनुसार, गरोदर बकीरवर 8 लोकांनी गँगरेप केला. त्याच्या दुसऱ्या दिवशी या बकरीचा मृत्यू झाला.
या घटनेने संपूर्ण देशाला हादरून टाकलं आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सोशल मीडियावर याचे पडसाद उमटले. #JusticeforGoat चा ट्रेंड सुरू झाला. आतापर्यंत माणसांसाठी न्याय मागण्याकरता सोशल मीडियाचा वापर केला गेला पण पहिल्यांदाच प्राण्यासाठी न्याय मागण्यात येत होता. आता जनावरांच्या सुरक्षेकरता देखील आवाज उठवला पाहिजे अशी मत समोर आली आहेत. या घटनेप्रकरणी सोशल मीडियावर अभिनेता दिग्दर्शक फरहान अख्तरने सोशल मीडियावर आपली भडास व्यक्त केली आहे. त्याने लिहिलं आहे की, 'या पुरूषप्रधान संस्कृतीमध्ये महिला आणि मुलं आतापर्यंत घाबरत होते मात्र आता कुत्रे आणि बकरी देखील शिकार होत आहेत.'
Women and children living in fear of the Indian man’s power politics and sexual perversion was not enough.. now goats and dogs will too. Something has gone seriously wrong in our evolution and our education. Where’s the light at the end of this tunnel?
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) July 29, 2018
आपल्या शिक्षणात काहीतरी चुकत आहे. कारण भारत सारख्या विकसनशील देशात महिला, मुलं आणि आता जनावर देखील सुरक्षित नाहीत. काही दिवसांपूर्वी कश्मीरमध्ये एका लहान मुलीचे यौन शोषण केल्याप्रकरणी बॉलिवूडने एकत्र आवाज उठवला होता.