'Ek Villain Returns' सिनेमात बोल्ड सीनसाठी दिशाने घेतलं इतकं मानधन

बोल्ड सीनसाठी नॅशनल क्रश दिशा पटानी घेते इतकं मानधन, विश्वासचं बसणार नाही  

Updated: Aug 3, 2022, 01:21 PM IST
'Ek Villain Returns' सिनेमात बोल्ड सीनसाठी दिशाने घेतलं इतकं मानधन title=

मुंबई : मोहित सुरी दिग्दर्शित 'एक व्हिलन रिटर्न्स' सिनेमाची सध्या तुफान चर्चा सुरु आहे. बॉक्स ऑफिसवर सिनेमा चांगली कमाई करताना दिसत आहे.  सिनेमात अभिनेता जॉन अब्राहम, अर्जुन कपूर अभिनेत्री तारा सुतारिया आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत दिसत आहेत. सिनेमात दिशाच्या बोल्ड सीनमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. एवढंच नाही बोल्ड सीनसाठी दिशाने तगडी फी देखील घेतली आहे. तर दुसरीकडे सिनेमात हिरोपेक्षा जास्त मानधन खलनायकाने घेतलं आहे . जाणून घेऊ सिनेमासाठी कोणी किती मानधन घेतलं... 

अभिनेता जॉन अब्राहम  
'एक व्हिलन रिटर्न्स' या सिनेमातील कलाकारांमध्ये जॉन अब्राहम सर्वात सिनियर अभिनेता आहे. म्हणून त्याची फीही सर्वाधिक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॉनने सिनेमात खलनायकाच्या भूमिकेसाठी 6 कोटी रुपये मानधन घेतलं आहेत.

अभिनेता अर्जुन कपूर 
जॉन अब्राहमनंतर अर्जुन कपूर दुसऱ्या लीडमध्ये आहे, त्याने 'एक व्हिलन रिटर्न्स'मध्ये काम करण्यासाठी निर्मात्यांकडून फी म्हणून 4 कोटी रुपये घेतले आहेत.

अभिनेत्री दिशा पटानी
सिनेमात दीशाने बोल्ड सीन दिले आहेत. ज्यामुळे नॅशनल क्रश दीशा पटानी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सिनेमात बोल्ड सीन देण्यासाठी अभिनेत्रीने 4 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. 

अभिनेत्री तारा सुतारीया
सिनेमात अन्या कलाकारांपैकी ताराचा अनुभव फार कमी आहे. म्हणून ताराला सिनेमातील मुख्य भूमिकेसाठी 2 कोटी रुपये मानधन देण्यात आल्याचं कळत आहे.