विद्यार्थ्यांवर आधारित 'बंटी बंडलबाज' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

आत्तापर्यंत अनेक शालेय जीवनावर आधारित सिनेमा आपण पाहिले आहेत.मात्र नुकत्या एका सिनेमाची घोषणा झाली आहे. जो शालेय जीवनावर आधारीत आहे.

Updated: Jun 3, 2024, 01:30 PM IST
विद्यार्थ्यांवर आधारित 'बंटी बंडलबाज' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला title=

मुंबई : सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकत्याच एक नव्याकोऱ्या सिनेमाची घोषणा केली गेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची जोरदार चर्चा होती. आत्तापर्यंत अनेक शालेय जीवनावर आधारित सिनेमा आपण पाहिले आहेत. यामध्ये श्यामची शाळा. शिक्षणाच्या आयचा घो, 'शाळा'. असे अनेक सिनेमा याआधी आले आहेत. मात्र नुकत्या एका सिनेमाची घोषणा झाली आहे. जो शालेय जीवनावर आधारीत आहे. मे महिन्याची सुट्टी संपत आली आहे. पुन्हा एकदा मुलं शाळेत जाण्यासाठी सज्ज आहेत. याचदरम्यान हा एक नवाकोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, 

यू. ए. कथाचित्र, बायसोसिएशन फिल्म्स आणि विचित्रकथा प्रस्तुत 'बंटी बंडलबाज' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे शीर्षक पाहाता प्रेक्षकांच्या मनात नक्कीच उत्सुकता निर्माण झाली असेल. या चित्रपटात आजच्या युगातील इंटरनेट, लॅपटॉपच्या साहाय्याने परीक्षेच्या कचाट्यातून सुटण्यासाठी आणि शाळेत प्रथम येण्यासाठी दोन विद्यार्थ्यांचा प्रयत्न तसेच त्यांनी शाळेत केलेली धमालमस्ती असे कथानक आहे.

 या सिनेमात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त गिरीश कुलकर्णी आणि देविका दफ्तरदार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सोबतीला ओम बेंडखळे, सार्थक पाटील, गणेश रेवडेकर, आकांक्षा गाडे यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.'बंटी बंडलबाज' या चित्रपटाची निर्मिती वैदही कृष्णन, ईशान महापात्रा, नेहा कोळवणकर आणि विवेक कदम यांनी केली आहे. अनिकेत रुमडे यांनी दिग्दर्शनासहित कथा, संवाद, पटकथा लेखनाची धुरा सांभाळली आहे तसेच या चित्रपटाचे सिनेमेटोग्राफर प्रताप राऊत आहेत. 

दिग्दर्शक अनिकेत रुमडे चित्रपटाच्या घोषणेबाबत म्हणतात, "या चित्रपटात दोन विद्यार्थ्यांचा  शाळेतील जीवनाचा प्रवास वर्णन केला असून शाळेत प्रथम येण्यासाठी त्यांनी उचलेली पावले तसेच बोर्डाने डिजिटल पद्धतीचा अवलंब केल्यानंतर त्यांनी निवडलेला मार्ग आपल्याला बघायला मिळेल. या चित्रपटात तुम्हाला शाळकरी मुलांची हुशारकी, मस्ती, धमाल, धमक, निरागसता बघायला मिळेल. तुम्हाला शाळेतले दिवस आणि त्या दिवसातला गोडवा परत अनुभवायचा असेल तर हा चित्रपट नक्की पाहा."