मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते गुरु दत्त यांचा जन्म 9 जुलै 1925 मध्ये झाला. गुरुदत्त यांचे खरं नाव वसंत कुमार शिवशंकर पादुकोण. गुरु दत्त यांनी हिंदी सिनेसृष्टीत दिग्दर्शक, कोरिओग्राफर म्हणून देखील काम केलं. पण ते नेहमीच त्यांच्या खाजगी आयुष्यातील चढ- उतारांमुळे चर्चेत राहिले.
गीता दत्त यांच्यासोबत संसार थाटल्यानंतर गुरु दत्त यांचं प्रेम अभिनेत्री वहीदा रेहमान यांच्यावर जडलं. पण वहिदा आणि गुरु दत्त यांच्या प्रेमाची गोष्ट पुढे जाण्यासाठी त्यांना योग्य मार्ग मिळालाच नाही. आज ही गुरु दत्त यांची ही ट्रॅजिडी लव्ह स्टोरी चर्चेत असते.
गुरु दत्त आणि वहिदा यांच्या प्रेमाची सुरुवात
गुरु दत्त फिल्म सीआईडीसाठी नवीन चेहऱ्याच्या शोधात होते, यावेळी वहीदा साऊथ चित्रपटांमध्ये काम करत होत्या. एका इव्हेंटमध्ये पहिल्यांदा वहिदा रहमान आणि गुरु दत्त यांची भेट झाली. त्यानंतर वहिदा यांची सीआईडी सिनेमासाठी स्क्रीन टेस्ट घेण्यात आली आणि त्यांचं सिलेक्शन देखील झालं. बोललं जातं की, याचं सिनेमाच्या सेटवर गुरु दत्त आणि वहिदा एकमेकांच्या जवळ आले.
एकत्र सिनेमांमध्ये केलं काम
बोललं जातं की, गुरु दत्त 'प्यासा' या सिनेमात वहिदा यांच्या अपोजिट काम कऱण्यासाठी दिलीप कुमार यांना घेणार होतो. पण वहिदाच्या प्रेमात असलेले गुरु दत्त यांनी स्वत:चं या सिनेमात वहिदा यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या प्रेमाचे किस्से तेव्हा सगळ्यांचे लक्षवेधून घेत होते. स्वत: गुरु दत्त वहीदा यांच्यासाठी खास सीन्स देखील लिहायचे.
जेव्हा वहिदा यांच्यावर रागावले गुरु दत्त
एक वेळ असा आला होता की, वहिदा यांच्या काही गोष्टींचा गुरु दत्त यांना एवढा राग आला की त्यांना वहिदा यांच्या एन्ट्री देखील बॅन केली. एकदा सेटवरील मेकअप रुममध्ये जाण्यापासून देखील वहिदा यांना रोकलं गेलं होतं, कारण गुरु दत्त यांच्या बोलण्यानुसार गोष्टी चालत होत्या. ‘टेन ईयर्स विद गुरुदत्त’या पुस्तकात वहीदा यांची एन्ट्री रद्द केल्याबाबत लिहिण्यात आलंय. या गोष्टीमुळे वहीदा खुपच दुखी होत्या , कारण ही गोष्ट वेगाने पसरली होती.
गुरु दत्त आणि वहिदा यांच्या प्रेमात दुरावा
वहिदा यांच्यासोबतच्या नात्याबद्दल जेव्हा गुरु दत्त यांची पत्नी गीता दत्त यांना समजलं, तेव्हा गुरु दत्त यांनी वहिदा यांच्यापासून स्वत:ला दूर केलं. पण वहिदा यांच्या प्रेमानं त्यांना असं काही वेड लावलं होतं, की त्यांना झोपच उडाली होती. अखेर 1974 मध्ये वहिदा यांनी आपला लाईफपार्टन निवडला.