कुटुंबीय आणि मित्रांना पुन्हा भेटायला मिळणार, ही भावनाच खूप आनंददायी आहे.
Updated: Dec 2, 2018, 03:29 PM IST
मुंबई: कॅन्सरच्या उपचारासाठी अमेरिकेत गेलेली बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे लवकरच भारतात परतणार आहे. सोनाली हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती दिली. या पोस्टमध्ये सोनालीने भारतात परतणे, आपल्यासाठी किती आनंददायी गोष्ट आहे, हे सांगितले. दुराव्यामुळे प्रेम आणखी वाढते. घरापासून दूर न्यूयॉर्कमध्ये असताना मी अनेक नवीन गोष्टी शिकले. मात्र, आता मी माझं मनं जिथे आहे, तेथे परतणार आहे. अशा गोष्टी खरंतर शब्दात व्यक्त करता येत नाहीत. मात्र, तरीही मी एवढेच सांगेन की, तुमचे कुटुंबीय आणि मित्रांना पुन्हा भेटायला मिळणार, ही भावनाच खूप आनंददायी आहे. तसेच आपल्याला आवडतात त्या गोष्टी लवकरच करायला मिळतील, याची उत्सुकता आणि आजपर्यंत मी जे आयुष्य जगले, त्याबद्दलची कृतज्ञता, अशा संमिश्र भावना आपल्या मनात दाटून आल्याचे सोनाली बेंद्रे हिने म्हटले आहे.
टेलिव्हिजनवरील 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज' या रिअॅलिटी शोची परीक्षक असलेल्या सोनालीने अचानक ब्रेक घेतला होता. त्यानंतर काही दिवसांतच तिने इन्स्टाग्रामवरून आपल्याला 'हाय ग्रेड' कॅन्सर झाल्याचे सांगितले होते. तेव्हापासून सोनाली न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत होती. या काळात ती नियमितपणे इन्स्टाग्रामवर फोटो टाकून आपले अनुभव सांगायची. यादरम्यान काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी न्यूयॉर्कमध्ये जाऊन तिची भेट घेतली होती.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.