अक्षय कुमारच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर; खास सदस्याचं निधन

 कामात सतत व्यग्र असणारा खिलाडी कुमार त्याच्या कुटुंबालाही तितकाच वेळ देताना दिसला. 

Updated: Mar 10, 2022, 11:29 AM IST
अक्षय कुमारच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर; खास सदस्याचं निधन  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार हा कायमच त्याच्या मनमिळाऊ आणि उत्साही स्वभावासाठी ओळखला जातो. रुपेरी पडदा गाजवणाऱ्या या अभिनेत्यासाठी 2021 हे वर्ष तसं आव्हानात्मक होतं. वाढदिवसाच्या काही दिवस आधीच त्याच्यावरचं मातृछत्र हरपलं. आईच्या निधनानं तो पुरता तुटला होता.

आता कुठे तो या साऱ्यातून सावरत होता, आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करत होता. कामात सतत व्यग्र असणारा खिलाडी कुमार त्याच्या कुटुंबालाही तितकाच वेळ देताना दिसला. 

कुटुंबासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या या अभिनेत्याच्या नात्याचे बंध आपण सर्वांनी पाहिले आणि या साऱ्याचा आपल्याला हेवाही वाटला. 

खिलाडी कुमारचं हे हसतं खेळतं आयुष्य, त्याचं कुटुंब प्रत्येकाच्याच मनाचा ठाव घेऊन गेलं पण, आता म्हणे त्यांच्या या आनंदाला कोणाचंतरी गालबोट लागलं. 

कारण, या कुटुंबातील एका खास सदस्याचं निधन झाल्याचं वृत्त समोर येत आहे. हा सदस्य आहे, त्याच्या घरातील पाळीव कुत्रा. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

एका अतिशय भावनिक पोस्टच्या माध्यमातून त्यानं लाडक्या क्लिओला श्रद्धांजली वाहिली. तू आमच्या हृदयाचाच एक भाग घेऊन गेलास... असं म्हणत क्लिओ त्याच्यासाठी नेमकं काय होता, हेच अक्षयनं शब्दांतून व्यक्त केलं आहे. 

एका मूक प्राण्याशी असणाऱं हे नातं, सध्या अतिशय बोलकं ठरत आहे... कारण खिलाडी कुमारचं मन हेलावून गेल्याचं यातून स्पष्टपणे दिसत आहे.