VIDEO: आईकडून लेक देवी शिकतेय डान्स स्टेप्स! 'या' गाण्यावर धरला ठेका; Bipasha Basu ची पोस्ट चर्चेत..

bipasha basu dance with devi: अभिनेत्री बिपाशा बासूनं आपल्या लहानग्या मुलीचा म्हणजेच देवीचा फोटो (Bipasha Basu Daugther Dance Video) चाहत्यांना दाखवल्यानंतर आता तिनं आपल्या लेकीसह एक क्यूट डान्स केला आहे. सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओचीच चर्चा आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Apr 28, 2023, 07:22 PM IST
VIDEO: आईकडून लेक देवी शिकतेय डान्स स्टेप्स! 'या' गाण्यावर धरला ठेका; Bipasha Basu ची पोस्ट चर्चेत.. title=

Bipasha Basu Dance With Daughter: अभिनेत्री बिपाशा बासू सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. सध्या ती आपल्या लेकीचे फोटो हे सोशल मीडियावर पोस्ट (Bipasha Basu Instagram Post) करताना दिसते. मागील वर्षी 12 नोव्हेंबर बिपाशाच्या मुलीचा जन्म झाला. त्यानंतर आपल्या मुलीचा चेहरा तिनं गुलदस्त्यात ठेवला होता. परंतु काही दिवसांपुर्वी बिपाशानं आपल्या लेकीचा फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता. मुलगी देवीच्या जन्मानंतरही ती तिचे फोटोज हे सोशल मीडियावर अपलोड करत होती परंतु तिनं देवीचा चेहरा दाखवला नव्हता. देवीचा चेहरा रिविल केल्यानंतरही ती आता देवीचे आणि तिचे हटके फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर शेअर करते आहे. 

सध्या तिचा हा व्हायरल व्हिडीओ खूप गाजतो आहे. या व्हिडीओमध्ये बिपाशा आपल्या लेकीसह छान (Bipasha Basu Daughter) वेळ व्यक्त करताना दिसतो आहे. सध्या तिच्या या व्हिडीओला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. बॉलिवूडच्याही अनेक मोठ्या सेलिब्रेटींनी तिच्या या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. सुझेन खाननं कमेंट केली आहे की, लहानग्या राजकुमारी देवीला भरपूर आर्शीवाद. त्याचसोबतच अनेक चाहत्यांनी बिपाशाच्या या व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. देवीचा क्यूटनेस पाहून सगळेच तिच्या प्रेमात पडले आहेत हे नक्की. 

या व्हिडीओमध्ये बिपाशा गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये दिसते आहे. यावेळी तिनं नो मेकअप लुक केला आहे. तिनं आपल्या मुलीला देवीला कडेवर घेतलं आहे आणि तिच्यासोबत ती डान्स करताना दिसते आहेत. यावेळी तिनं टेलर स्विफ्टचं नेवर ग्रो अप हे गाणं लावलं आहे. त्या गाण्यावर तिनं ताल धरला आहे. देवीसोबत डान्स करणं ही माझ्यासाठी सर्वात आवडती गोष्ट आहे, असं कॅप्शन तिनं दिलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काही दिवसांपुर्वी बिपाशानं आपल्या लेकीचा फोटो व्हायरल केला होता. ज्यात देवी गोड अशा गुलाबी ड्रेसमध्ये दिसत होती. तिचं स्मितहास्य पाहून अनेकांचे हृदय वितळले. करण सिंग ग्रोवरसह बिपाशानं 2016 साली लग्नगाठ बांधली आहे. त्यांचे अनेक वर्षे अफेअर होते व त्यांच्या अफेअरच्याही बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. बिपाशानं तिच्या प्रेग्नंन्सीची घोषणा केल्यानंतर इन्टाग्रामवर फक्त तिचीच चर्चा होती. तिचे प्रेगन्सी शूटही प्रचंड व्हायरल झाले होते. त्यावर चाहत्यांचे तूफान लाईक्स येत होते. दोन दिवसांपुर्वी बिपाशानं हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आत्तापर्यंत या व्हिडीओला लाखांच्या घरात व्ह्यूज आले आहेत. तर 76 हजारांच्यावर लाईक्स आले आहेत.