बिग बॉसमध्ये होणार सनी लिओनीची Grand Entry

 जेव्हाही बिग बॉसचा टीआरपी घसरला आहे तेव्हा निर्मात्यांनी असा काही तडका बनवला आहे की, अचानक शोच्या टीआरपीमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे.

Updated: Aug 30, 2021, 05:23 PM IST
बिग बॉसमध्ये होणार सनी लिओनीची Grand Entry title=

मुंबई :  जेव्हाही बिग बॉसचा टीआरपी घसरला आहे तेव्हा निर्मात्यांनी असा काही तडका बनवला आहे की, अचानक शोच्या टीआरपीमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. यावेळीही शोचे निर्माते असंच काहीसं करणार आहेत. एक्स पॉर्न स्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी लवकरच बिग बॉस OTT मध्ये एंट्री करणार आहे.

बिग बॉसच्या घरात सनीची एन्ट्री
शोमध्ये, सनी लिओन एंट्री घेणार आहे, ज्यामुळे अचानक घरातील तापमान वाढू शकते. सनी लिओनी बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून नव्हे तर पाहुणी म्हणून प्रवेश करणार आहे. सनी लिओनने एका व्हिडिओद्वारे तिच्या घरात प्रवेशाची माहिती दिली आहे ज्यात सानीने सांगितलं आहे की, ती स्वतः बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी खूप उत्साहित आहे.

व्हिडिओमध्ये सनी लिओनी म्हणाली, 'मी बिग बॉस ओटीटीसाठी वेडी झाले आहे, तुम्ही जितका हा शो पहाल तितका कमीच फिल. मी या आठवड्याच्या शेवटी माझ्या स्वतःच्या शैलीत खूप मजा करण्यासाठी येत आहे. आता सनीच्या स्टाईलमध्ये हा शो कसा नवीन वळण घेईल हे पाहावं लागेल. साहजिकच सनी लिओनीच्या या गोष्टीने निर्मात्यांना विचार करायला भाग पाडलं आहे. हे देखील पाहिलं जाईल की सनी लिओनी घरात एकटी जाईल किंवा तिचा त्याच्याशी संबंधित काही कनेक्शन जाईल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सनी लिओनी हा शो होस्ट करते
सनी लिओनीने कमी चित्रपट केले असतील पण तिचं फॅन फॉलोइंग नेहमीच जबरदस्त आहे. अभिनेत्री बिग बॉस सीझन 5 चा भाग राहिली आहे, त्यानंतर बॉलिवूडमध्ये तिची मागणी अचानक वाढली. या व्यतिरिक्त, सनी लिओनी बऱ्याच काळापासून रियालिटी टीव्ही शो स्प्लिट्सविला होस्ट करत आहे, जो कनेक्शन  बेस्ड  शो आहे.