मुंबई : अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपने काही दिवसांपूर्वी कॅन्सर ट्रीटमेंट सुरू केली आहे. याबाबत तिने सोशल मीडियातून माहिती दिली. ताहिराने आयुष्मान खुरानासोबत फोटो शेअर करताना म्हटलं आहे की,'शेवटची किमोथेरपी पूर्ण झाली आहे.' आता ताहिराने आपला फोटो शेअर केला आहे. कॅन्सरवर उपचार घेत असताना तिचे संपूर्ण केस गेल्यामुळे तिने आपला बाल्ड लूक शेअर केला आहे. किमोथेरपीचा परिणाम तिच्यावर झाल्याच स्पष्ट झालं आहे. ताहिराचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. तिचा हा फोटो आणि तिची भावनिक पोस्ट दोन्हीने प्रेक्षकांना लक्ष केंद्रीत केलं आहे.
ताहिराने हा बाल्ड लूक शेअर करताना, 'हॅलो, ही मी आहे. जुन्या लूकला घेऊन मी थकले होते. त्यामुळे आता हा लूक कसा आहे? या मोकळ्या रुपाचा विचार करण्यात एक वेगळी संधी आहे. ती मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. मी कधीच विचार केला नव्हता की, माझ्या डोक्यावरचे सगळे केस जातील. पण मी आता चांगल फील करत आहे.'या अगोदर कॅन्सरबाबत ताहिराने लिहिलं होतं की, 'जेव्हा कॅन्सरबद्दल कळतं तेव्हा आपण त्याला बाहेरचा रस्ता दाखवतो. पण हे खूप कठिण असतं. आपल्या स्वतःमध्ये असलेल्या ताकदीचा आपल्याला अंदाज नसतो. जेव्हा तुमच्यावर कोणतं संकट येतं तेव्हा ते पूर्णपणे तुमच्यावर असतं की, त्या गोष्टीला तुम्ही पूर्णपणे हरवा आणि तुम्ही अधिक उत्तम व्हा.'
Hello world! That’s a new me with the old self! Was getting tired of the extensions. Well this is how it is & it’s so liberating, so much so that I don’t have to duck the shower while bathing or while picking up the soap! Never thought I had go bald, but this feels good pic.twitter.com/mvZtepKjii
— Tahira Kashyap Khurrana (@tahira_k) January 16, 2019
या संपूर्ण प्रकरणाकडे ताहिरा इतक्या सकारात्मकपणे बघते की, ती म्हणते, 'आता माझं अपग्रेडेड वर्जन कॅन्सरच्या स्टेज 1 शी लढत आहे. माझ्या किमोथेरपी 12 होणार असून 6 झाले आहेत आणि 6 बाकी आहेत. ही पोस्ट माझ्या या प्रवासाला समर्पित केले असून मी याची अर्धी लढाई जिंकली आहे. यापुढची लढाई मला त्या सगळ्यांसोबत लढायची आहे जे आता या त्रासाने ग्रस्त आहेत. आपण यातून बाहेर पडू. यासोबतच माझ्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व लोकांचे आभार. ज्यांनी माझी साथ कधीच सोडली नाही.'