लग्नाच्या 3 वर्षानंतर आई होणार अंकिता लोखंडे! मित्रानंच केला खुलासा

Ankita Lokhande Pregnant : अंकिता लोखंडेच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना पुन्हा कधी उधाण...

दिक्षा पाटील | Updated: Aug 23, 2024, 03:56 PM IST
लग्नाच्या 3 वर्षानंतर आई होणार अंकिता लोखंडे! मित्रानंच केला खुलासा
(Photo Credit : Social Media)

Ankita Lokhande Pregnant : छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयानं छाप सोडणाऱ्या अभिनेत्रींमध्ये अंकिता लोखंडेचं नाव येतं. अंकिता ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते. दरम्यान, आता अंकिता चर्चेत येण्याचं कारण तिचं खासगी आयुष्य आहे. अंकिता प्रेग्नंट असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. खरंतर लग्नाच्या 3 वर्षांनंतर अंकिता प्रेग्नंट आहे. याचा खुलासा तिच्या जवळच्या मित्रानं केला आहे. 

अंकितानं तिचा नवरा विकी जैनसोबत 'लाफ्टर शेफ' शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी अंकिताच्या प्रेग्नंसीविषयी तिचा सह-कलाकार आणि मित्र अली गोनीनं हिंट दिली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, छोटा जैन लवकरच येणार आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून ऑफ कॅमेरा शूट करण्यात आला आहे. या व्हिडीओत 'लाफ्टर शेफ' ची संपूर्ण टीम बसल्याचे पाहायला मिळत आहे. ते सगळे रिलॅक्स करत असल्याचं दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत अलीनं कपलला टीज करत म्हटलं की छोटा जैन येणार आहे. छोटा जैनी येणार आहे. जैनी. हे ऐक जैनी येतोय. जैनी. हे ऐकून विकी जेन देखील हसू लागतो. व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये अंकिता लोखंडेची प्रेग्नंसीवर पुन्हा चर्चा होऊ लागल्या. मात्र, हे किती सत्य आहे. त्याची कोणतीही अधिकृत बातमी मिळालेली नाही. 

अंकिता आणि विकीनं कपल म्हणूनच बिग बॉस 17 मध्ये पार्टिसिपेट केलं होतं. शोमध्ये गेल्यापासून अंकिताच्या प्रेग्नंसीची चर्चा सुरु होती. शो संपल्यानंतर त्या दोघांना हाच प्रश्न विचारण्यात आला होता. जर अंकिता आणि विकी आई-वडील होणार आहेत. तर चाहत्यांना नक्कीच आनंद होईल. कारण त्यांची जोडी ही नेहमीच चर्चेत असते. मात्र, बिग बॉसच्या घरात जेव्हा ते दोघे होते तेव्हा त्यांच्यात प्रेम कमी दिसलं आणि भांडणं जास्त दिसली. शोमध्ये त्या दोघांना सतत एकमेकांशी भांडताना पाहून अनेकांनी त्यांना ट्रोल केलं. त्यांना पाहून असं वाटतं होतं की ते दोघं घटस्फोट घेऊन विभक्त होतील. 

हेही वाचा : 'आजकाल प्रत्येकाला प्रसिद्धी हवी'; अरशद वारसीच्या आरोपांवर भडकले बोनी कपूर

दरम्यान, जसा बिग बॉस हा रिअॅलिटी शो संपला तसंच त्यांनी त्यांच्या नात्याला आणखी चांगलं बनवलं. दोघेही सध्या कुकिंग शो 'लाफ्टर शेफ' मध्ये दिसत आहेत.