अभिषेक पोहोचला 'kbc16'च्या सेटवर, अमिताभ बच्चन बोलले- अभिषेकला बोलवून केली चूक...

kbc16 : गेल्या अनेक दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन घटस्फोटामुळे चर्चेत आहेत. अशातच अभिषेक त्याच्या आगामी चित्रपट 'आई वॉन्ट टू टॉक'च्या प्रोमोशनसाठी 'कॉन बनेगा करोडपती'च्या शोमध्ये आला होता.  

Intern | Updated: Nov 15, 2024, 05:09 PM IST
अभिषेक पोहोचला  'kbc16'च्या सेटवर, अमिताभ बच्चन बोलले- अभिषेकला बोलवून केली चूक... title=

Abhishek Bachchan On KBC 16: अभिषेक बच्चन सध्या त्याचा खाजगी आयुष्यामुळे खूपच चर्चेत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाची अफवा तर गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर पसरत आहे. अशातच अभिषेक बच्चनचा आगामी चित्रपट 'आई वॉन्ट टू टॉक' हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी अभिषेक बच्चनला आपल्या वडीलांनी म्हणजे अमिताभ बच्चन यांनी 'कॉन बनेगा करोडपती'च्या शोमध्ये बोलवले होते.

बिग बींना अभिषेक बच्चनला KBC मध्ये बोलवून चूक केली असे देखील वाटत आहे. नुकताच सोनी टीव्हीने या शोचा प्रोमो शेयर केला. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीयोमध्ये अभिषेक बच्चन आपल्या वडिलांसोबत हॉट सीट बसून गप्पा मारताना दिसत आहेत. अभिषेक बच्चन प्रेक्षकांना आपले वडील '7 करोड' कसे ओरडतात याची नक्कल करुन दाखवत आहे.  

अमिताभ बच्चन यांना चूक झाली असे का वाटत आहे ?
 
अभिषेक बच्चन आपल्या वडिलांची चेष्टा करत होता आणि प्रेक्षकांना सांगत होता की घरी डिनर करतांना कोणी प्रश्न विचारला तर याचं खास अंदाजात '7 करोड' असे ओरडतात. हे ऐकून सगळे खूप हसु लागतात. यावरचं अमिताभ बोलले की, अभिषेकला बोलवून चूक केली. हा प्रोमो पाहून सगळेचं या शोच्या टेलिकास्ट होण्याची वाट बघत आहेत. अभिषेक बच्चनचा आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन शूजित सरकारने केले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

22 नोव्हेंबर रोजी मोठ्या पडद्यावर येणार 'हा' चित्रपट

'आई वॉन्ट टू टॉक' हा चित्रपट 22 नोव्हेंबर 2024 ला रिलीज होणार आहे. या चित्रपटात पियरले डे, अहिल्या बामरू, जयंत कृपलानी, क्रिस्टिन गोडार्ड आणि जॉनी लीवर हे कलाकार दिसणार आहे. अभिषेक बच्चनचे या चित्रपटात अर्जुन हे नाव आसणार आहे. या पात्राला खासगी आयुष्यात खूप त्रास असतात. हा चित्रपट पाहाण्यासाठी अभिषेकचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.