11 चित्रपट फ्लॉप दिल्यानंतर बुडतं करिअर वाचवण्यास 'या' चित्रपटाला बिग बींनी दिला होकार अन् आज...

बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांना आजही सर्वात लोकप्रिय अभिनेता मानले जाते, परंतु एक काळ असा होता जेव्हा त्यांचे करिअर संकटात होते. त्यांच्या काही फ्लॉप चित्रपटांमुळे अमिताभ बच्चान यांनी इंडस्ट्री सोडण्याचा विचार केला होता.   

Intern | Updated: Jan 9, 2025, 04:28 PM IST
11 चित्रपट फ्लॉप दिल्यानंतर बुडतं करिअर वाचवण्यास 'या' चित्रपटाला बिग बींनी दिला होकार अन् आज... title=

अमिताभ बच्चन यांच्या करिअरला वळण देणारा चित्रपट म्हणजे 'जंजीर'. यातील एक डायलॉग - 'जब तक बैठने को ना कहा जाए, शराफत से खड़े रहो...ये पुलिस स्टेशन है...तुम्हारे बाप का घर नहीं!' -ने बिग बींचे नशीब बदलले. परंतु हा चित्रपट मिळविणे त्यांना तितके सोपे नव्हते. यापूर्वी त्यांचा बॉलिवूडमध्ये खूप वाईट टप्पा सुरु होता आणि त्यावेळी अनेक प्रमुख कलाकारांनी हा चित्रपट करण्यास नकार दिला होता.

सलीम खान यांनी एक मुलाखतीत 'जंजीर' चित्रपटाच्या संदर्भात काही गोष्टी उघडकीस आणल्या. त्यानुसार, सलीम खान यांनी पहिल्यांदा धर्मेंद्र यांना चित्रपटासाठी विचारले होते, परंतु काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी नकार दिला. त्यानंतर देवा आनंद यांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की, 'जंजीर'मध्ये गाणी नाहीत, त्यामुळे त्यांनी या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. त्याचप्रमाणे, दिलीप कुमार यांनी देखील चित्रपटात अभिनय करण्यास नकार दिला, कारण त्यांना त्यात काही खास भूमिका दिसत नव्हती.

हे ही वाचा: फराह खान: संघर्षातून स्टारडमकडे; दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफरच्या जीवनाची प्रेरणादायी कथा

अमिताभ बच्चन यांच्यासाठी 'जंजीर' हा चित्रपट एक टर्निंग पॉईंट ठरला. त्यांना याआधी 11 फ्लॉप चित्रपटांचा सामना करावा लागला होता, पण 'जंजीर' ने त्यांचे करिअर पुनरुज्जीवित केले. सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या या पटकथेने भारतीय चित्रपटांचा दृष्टीकोन बदलून टाकला. याशिवाय, 'जंजीर' चित्रपटात नायिकेला कोणतीही भूमिका नव्हती, ज्यामुळे जया बच्चन यांना सुद्धा कमी स्क्रीन टाइम असतानाही या चित्रपटाच्या माध्यमातून अमिताभच्या करिअरला आधार देण्याच्या तयारीत होत्या. 

प्रकाश मेहरा दिग्दर्शित 'जंजीर'मध्ये प्राण, अजित खान आणि बिंदू यांसारख्या दिग्गज कलाकारांनीही काम केले होते. 1973 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अमिताभ बच्चन यांना सुपरस्टार बनवले आणि त्याच्यासाठी बॉलिवूडच्या दृष्टीने एक नवीन वळण ठरले.