Ali Goni आणि Jasmin Bhasin च्या ब्रेकअप मागचं सत्य काय? जाणून घ्या

अली गोनी आणि जास्मिन भसीन हे टेलिव्हिजन विश्वातील सगळ्यात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत

Updated: Feb 19, 2022, 04:03 PM IST
Ali Goni आणि Jasmin Bhasin च्या ब्रेकअप मागचं सत्य काय? जाणून घ्या title=

मुंबई : 'बिग बॉस 14' च्या घरात एक कपल म्हणून दिसणारं लव्हबर्ड्स अली गोनी आणि जास्मिन भसीन हे टेलिव्हिजन विश्वातील सगळ्यात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. मात्र सध्या त्यांच्या विभक्त झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दोघांचं ब्रेकअप झाल्याचा दावा करण्यात आला आहे. आता अली गोनीनेच या वृत्तांवर मौन तोडलं आहे.

खुश आहे अली गोनी
जशी ही अफवा पसरु लागली आहे ते ऐकून या दोघांचे फँन्स चिंतीत होवू लागले आहेत. मात्र आता अली गोनीने सगळ्या अफवांवर स्वत:च मत मांडलं आहे. बॉलिवूड लाईफशी संवाद साधताना त्याने सांगितलं की, तो या अफवांवर काहीच बोलू ईच्छित नाही. त्याने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन उत्तर मिळवण्यासाठी आपल्या पीआरशी संपर्क साधण्यासाठी सांगितलं आहे. या मुलाखतीमध्ये बोलताना तो म्हणाला की, या सगळ्या अफवा ऐकल्यानंतर मी खूप खुश आहे.''

अभिनेत्याच्या जवळील सुत्रांच्या माहितीनुसार यादोघांमध्ये काहिच बिघडलं नाहीये. त्यांच्या वेगळं होण्याच्या बातम्या खूप मजेदार आहेत. असं सांगत तो पुढे म्हणाला की, प्रत्येक कपलमध्ये भांडण होतात. याचा अर्थ हा नव्हे की, हे दोघं वेगळे झाले आहेत. नुकताच या दोघांनी एकत्र व्हेलंटाईन डे देखील साजरा केला.