Adnan Sami's Brother Blamed Him On His Indian citizenship : लोकप्रिय गायक अदनान सामी (Adnan Sami) हा त्याच्या भारतीय नागरिकतेमुळे नेहमीच चर्चेत असतो. कुठे ना कुठे त्याचा विषय निघतो आणि अदनान सामीला ट्रोल करण्यास सुरुवात होते. दरम्यान, अदनान सामी आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. अदनान सामीचा भाऊ जुनैद सामी खाननं त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जुनैदनं अदनानला स्वार्थी, खोटरडा म्हटलं आहे. इतकंच काय तर अदनानची डिग्री सुद्धा खोटी असल्याचं त्यानं म्हटलं आहे. जुनैदनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अदनान सामीवर हे गंभीर आरोप केले आहेत.
जुनैदनं ही पोस्ट शेअर केल्याचेवृत्त 'आजतक'नं दिले आहे. या पोस्टमध्ये जुनैद म्हणाला, 'अदनानचा जन्म 15 ऑगस्ट 1969 रोजी रावळपिंडी येथील रुग्णालयात झाला होता. तर माझा जन्म 1973 मध्ये त्याच रुग्णालयात झाला. त्यामुळे अदनानचा जन्म इंग्लंड किंवा इतर कोणत्याही ठिकाणी झाल्याचा दावा हा पूर्णपणे खोटा आहे. इंग्लंडमध्ये तो O लेव्हलवर फेल झाल्यानंतर त्यानं लाहौरमध्ये डिग्री बनवली. तर अबू धाबीमध्ये त्यानं प्रायव्हेटली A लेव्हल केलं.'
जुनैद याविषयी बोलताना म्हणाला, 'मी प्रतिभावान आहे आणि गाणं गाऊ शकतो हे अदनानला माहित होते. मात्र, त्यानं कधीच मला त्यासाठी मदत केली नाही. भारतात त्यानं मला लॉन्च केलं नाही. कारण अदनानला भीती होती की त्याच्या पेक्षा चांगलं काम जर मी केलं तर काय होईल. आता तर मी घरीच बसून आहे, माझ्याकडे काही काम नाही आणि या सगळ्या गोष्टीला जबाबदार अदनान आहे.'
पुढे अदनाननं दुसऱ्या पत्नीच्या पॉर्न डीव्हीडी बनवल्या हे सांगत जुनैद म्हणाला, 'या गोष्टीचा मला त्रास झाला. मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत सुद्धा असं कधीच करू शकणार नाही. त्याने 2007-08 साली दुसरी पत्नी सबा गलादेरीच्या पॉर्न डीव्हीडी बनवल्या. पती-पत्नीमधील गोष्टी फक्त आपापसातच ठेवल्या जातात. अदनानने या डीव्हीडी कोर्टाला दिल्या होत्या. हे व्हिडीओ सबाच्या बॉयफ्रेंडने बनवल्याचा दावा अदनानने यावेळी कोर्टात केला होता, पण ते सगळं खोटं आहे.'
जुनैद अदनानच्या भारती नागरिकत्वावर गंभीर आरोप करत म्हणाला, 'अदनानने भारताचे नागरिकत्व घेतले कारण येथे त्याला चांगले पैसे मिळतात, जे पाकिस्तानमध्ये मिळत नाहीत. तर आई ही भारतीय आहे अदनानचा हा दावाही खोटा आहे. तर कॅनडात झालेल्या छापेमारी दरम्यान, अदनान तुरुंगातही जाऊन आला आहे.'
दरम्यान, एका मुलाखतीत अदनानं त्यानं पैसे घेऊन नागरिकत्व घेतल्याच्या दाव्यावर वक्तव्य केलं होतं. खरंतर 2016 साली अदनानं पाकिस्तानी नागरिक्त सोडत भारतीय नागरिक्त घेतलं. त्यावर एका मुलाखतीत अदनानं स्पष्ट वक्तव्य केलं होतं. लोक काही विचार न करता काहीही बोलतात. भारतीय नागरिक्त घेणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. त्यासाठी त्याला 18 वर्षे लागली.
हेही वाचा : अंडरवर्ल्ड डॉनच्या प्रेमात वेडी झाली 'ही' लोकप्रिय Actress! त्याच्यासाठी केली धूणी भांडी
याविषयी बोलताना अदनान पुढे म्हणाला, 'भारतीय नागरिकत्व मिळण्याआधी माझा अर्ज दोन वेळा रिजेक्ट करण्यात आला होता. दीड वर्षे मी कोणत्याच देशाचा नागरीक नव्हतो. माझा पासपोर्ट हे फक्त एक डॉक्युमेट राहिलं होतं. पण त्याचा वापर करून मी कुठे प्रवास देखील करु शकत नव्हतो.