अभिनेत्री अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; लवकरच दिसणार नव्या सिनेमात

झी मराठी वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहचलेले राणा-अंजली नेहमी चर्चेत असतात. 

Updated: Aug 22, 2022, 08:35 PM IST
अभिनेत्री अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; लवकरच दिसणार नव्या सिनेमात

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहचलेले राणा-अंजली नेहमी चर्चेत असतात. अशीच एक चर्चेने सध्या जोर धरलीये ती म्हणजे, या कपलने लग्नाआधीच गुडन्यूज दिलीये. काही दिवसांपूर्वीच या कपलने साखरपूडा करुन प्रेक्षकांना आनंदाचा धक्काच दिला होता.  यानंतर आता आणखी एक गुडन्यूज त्यांनी दिली आहे.

 दोघांच्याही आयुष्यातील लग्नाआधीची हि सगळ्यात मोठी गुडन्यूज समोर आली आहे. हि गुडन्यूज म्हणजे, अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे दोघंही आगामी मराठी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. मध्यंतरी अक्षया आणि हार्दिक दोघेही लंडन दौऱ्यावर होते. आता या लंडन दौऱ्यात काय घडलंय ते समोर आलं आहे. 

याची नुकतीच घोषणा करण्यात आली असून एक पोस्टरही रिलीज करण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव 'चतुर चोर' असं आहे. 'चतुर चोर' हा चित्रपट एक हॉरर कॉमेडी थ्रिलिंग सिनेमा आहे अशी माहिती देण्यात आली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'चतुर चोर' या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतच लंडन येथे पार पडलं आहे. या सिनेमात 'लागीर झालं जी' फेम अभिनेता नितीश चव्हाण देखील दिसणार आहे.  किरण कुमावत, स्वाती खोपकर, सुरेखा कागणे, हर्षवर्धन गायकवाड, अमोल कागणे आणि सागर पाठक हे या नव्याकोऱ्या चित्रपटाचे निर्माते आहेत.  अमोल गोळे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन आणि छायाचित्रण केलं आहे. याशिवाय चित्रपटाची कथा लेखक सुमित संघमित्रा आणि सागर पाठक यांनी लिहिली आहे.