आमीर खानची (Aamir Khan) मुख्य भूमिका असणारा 'लाल सिंग चढ्ढा' (Lal Singh Chaddha) चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) सपशेल अपयशी ठरला होता. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्सन अद्वैत चंदनने केलं असून करिना कपूरही मुख्य भूमिकेत होती. चित्रपट अपयशी ठरल्याने आमीर खान प्रचंड नाराज झाला होता. त्याने चित्रपटाती सह अभिनेत्यांची माफीही मागितली होती. दरम्यान आता आमीर खानने चित्रपटातील आपला अभिनय फार वाईट होता अशी जाहीर कबुली दिली असून, त्यामुळे चित्रपट अपयशी झाल्याचं म्हटलं आहे. रिया चक्रवर्तीच्या (Rhea Chakraborty) पॉडकास्टला आमीर खानने हजेरी लावली होती. यावेळी त्याने ही कबुली दिली. दरम्यान आमीर खानने हे मान्य केल्याने ट्विटरवर नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत.
"लाल सिंग चढ्ढामधील जो माझा अभिनय होता त्यात पिच थोडा वरचा लागला होता. फॉरेस्ट गम्प चित्रपटाचं लेखन मेनस्ट्रीमसाठी नसलं तरी टॉम हँक यांचा अभिनय इतका कमाल होता की त्यांनी तो चित्रपट पूर्णपणे स्वत:च्या बळावर खेचला. माझ्या अभिनयामुळे हा चित्रपटा पडला. माझ्या अभ्यासानुसार, माझी अभिनय ठीक नव्हता. मला त्यातून फार काही शिकायला मिळालं. यामुळे कदाचित पुढील चित्रपटात माझी कामगिरी चांगली असेल," असं आमीर खान म्हणाला.
यावेळी रिया चक्रवर्तीने आपल्याला मात्र लाल सिंग चढ्ढामधील अभिनयात काही सुधारणेची गरज होती असं म्हटलं. त्यावर आमीर खानने सांगितलं की, "एक क्रिएटिव्ह व्यक्ती म्हणून आम्ही जे बनवण्याचा प्रयत्न करत होतो त्याच्या थोडं जवळ पोहोचलो असं मला वाटतं. काही लोकांना हा चित्रपट फार आवडला. हा त्यांचा आवडता चित्रपट आहे. पण अनेकजण या चित्रपटाशी कनेक्ट होऊ शकले नाहीत. याचं कारण माझा अभिनय चांगला नव्हता".
In #LaalSinghChaddha my performance was bad, I have learnt from it and had a really good time in making of #SitaareZameenPar
Show me an actor who publicly criticises his own performance
Megastar #AamirKhan pic.twitter.com/KUOJMfQXZC— RAJ (@AamirsDevotee) August 25, 2024
रियाने यावेळी अभिनेते मात्र कधीच अशी कबुली देत नाहीत सांगितल्यावर आमीर म्हणाला की, "जेव्हा तुम्ही चूक करता किंवा कमी पडता तेव्हा ती एक संधी असते. तुम्ही तुमच्या कामाप्रती प्रामाणिक असायला हवं. मी चित्रपटांमध्ये काम करणार नाही म्हटल्यानंतर आता सितारे जमीन परमध्ये काम करताना मला फार मजा आली".
आमीर खानने आपण कमी पडल्याची आणि आपल्यामुळे चित्रपट फ्लॉप झाल्याची कबुली दिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. आपल्याच अभिनयावर जाहीरपणे टीका करणारा अभिनेता दाखवा अशा शब्दांत युजरने आमीर खानवर स्तुतीसुमनं उधळली आहेत.
काहींनी अर्शद वारसीने प्रभासवर केलेल्या टीकेचा संदर्भ देत आमीरचं कौतुक केलं आहे. 'चांगल्या हेतूने टीका करताना जोकर म्हटल्याने काही अभिनेते मात्र दुखावतात. फक्त एक महान अभिनेताच आपल्यावर टीका करु शकतो,' असं एका युजरने म्हटलं.
लाल सिंग चड्ढा (2022) हा अद्वैत चंदन दिग्दर्शित कॉमेडी ड्रामा आहे. 1994 मध्ये आलेल्या हॉलिवूड चित्रपट फॉरेस्ट गंपचा हा हिंदी रिमेक आहे. यात आमिर आणि करीना व्यतिरिक्त नागा चैतन्य आणि मोना सिंग होते.