मुंबई : अरूंधती, प्रत्येकीला आपल्यातलीच एक वाटणारी. स्टार प्रवाहावरील 'आई कुठे काय करते' या मालिकेतील प्रमुख पात्राला म्हणजे अरूंधतीची वेगळी ओळख सांगायची गरज नाही. खऱ्या आयुष्यात आई वेगवेगळ्या भूमिकेतून, परिस्थितीतून जात असते. ही परिस्थिती अरूंधतीने अचूकपणे मांडली आहे.
आपला संसारच सर्वस्व समजून अरूंधती देशमुखांचा 'समृद्धी' बंगला आपलासा करते. सासू सासऱ्यांची काळजी घेणं, नवऱ्याला काय हवं नको ते पाहणं आणि चांगली आई होणं एवढंच अरूंधतीच्या आयुष्याचं ध्येय बनतं.
पण तब्बल २५ वर्षांचा संसार एका क्षणात उद्ध्वस्त होतो. आणि अरूंधती पूर्णपणे कोलमंडते. पण त्या सगळ्या परिस्थितीवर मात करत अरूंधती उभी राहते. नव्याने पहिलं पाऊल टाकण्याचा प्रयत्न करते.
पण तिचा हा प्रयत्न तिचा नवरा अनिरूद्ध आणि तिची सासू कांचन यांच्या टोळ्यात खूपतो. एवढ्या सामान्य गायिकेला एवढी मोठी गाण्याची संधी कशी मिळते.
सुनेचं असं दुसऱ्यासोबत फिरणं सासूला खटकत असल्यामुळे तीच्या मनात संशयाची पाल चुकचुकते. आणि अनिरूद्ध, संजना तिच्या या संशयाला खतपाणी घालतात.
सारं काही कशासाठी तर त्या घराच्या अर्ध्या तुकट्यासाठी. संजना आणि कांचन एकत्र येतात. आप्पा अरूंधतीला समृद्धी बंगल्याचा अर्धा हिस्सा आहे. तो हिस्सा पुन्हा कांचन यांना देण्यासाठी संजना अरूंधतीची सही घेते.
अरूंधती आपल्या हक्काच्या घरावर पाणी सोडणार का? असा प्रश्न साऱ्यांना पडतोय.