अर्जुन कपूरच्या बहिणीचा खाजगी व्हिडिओ लीक; चाहत्यांना बसतोय धक्का

अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला तिच्या बोल्ड स्टाईलसाठी ओळखली जाते

Updated: Oct 12, 2022, 08:26 PM IST
अर्जुन कपूरच्या बहिणीचा खाजगी व्हिडिओ लीक; चाहत्यांना बसतोय धक्का title=

मुंबई : गेल्या काही वर्षांत मुलींमध्ये डिझायनर आणि स्टायलिश ब्रा घालण्याची क्रेझ खूप वेगाने वाढली आहे. यादरम्यान, काही मुली अशा असतात ज्या ब्रा घालताना कमर्फटेबल दिसत नाहीत. बराच वेळ ब्रा घातल्याने त्रासलेल्या अंशुला कपूरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो आता व्हायरल झाला आहे.

अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला तिच्या बोल्ड स्टाईलसाठी ओळखली जाते आणि यावेळी देखील तिने असंच काही केलं आहे जे करण्यास मुली अनेकदा घाबरतात.आम्ही तुम्हाला सांगतो की अंशुला अशा मुलींपैकी एक आहे जिला ब्रा घालणं आवडत नाही. पण घरातून बाहेर पडताना तिला ब्रा घालण्याची सक्ती केली जाते.

अंशुलाने नुकताच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती बाहेरून घरी येताच आधी तिची ब्रा काढते.  ब्रा काढल्यानंतर अंशुला एकदम फ्रेश वाटत आहे. हा मजेदार व्हिडिओ शेअर करत अंशुलाने लिहिले की, 'संडे ब्रंचमधून घरी येण्याचा सर्वात चांगला भाग. #no_bra_club.'

अंशुलाच्या या व्हिडीओवर सातत्याने कमेंट येत आहेत, मात्र यादरम्यान प्रियांका चोप्राची कमेंट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. खरं तर प्रियंका देखील अशा मुलींपैकी एक आहे जिला ब्रा घालायला आवडत नाही. खरंतर हे आम्ही म्हणत नसून, प्रियांका चोप्रानेच सांगितलं आहे. प्रियांकाने अंशुलाच्या नो ब्रा व्हिडिओमध्ये 'Everyday' कमेंट केली. याचा अर्थ देसी गर्ललाही अंशुलाप्रमाणे रोजच हे करते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्रियांका चोप्राशिवाय एका यूजरने लिहिलं आहे की, 'ही माझी रोजची दिनचर्या आहे.' दुसऱ्या यूजरने व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहिलं आहे की, 'एक आझादी से प्यार.' तर दुसऱ्या यूजरने लिहिलं आहे की, 'ही सर्वोत्तम भावना आहे.'