VIDEO : 'टोटल धमाल'मध्ये सोनाक्षीचा 'मुंगडा' अवतार

या गाण्यात दिसतेय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा... तेही एकदम सेक्सी अवतारात...

Updated: Feb 5, 2019, 02:06 PM IST
VIDEO : 'टोटल धमाल'मध्ये सोनाक्षीचा 'मुंगडा' अवतार title=

मुंबई : अभिनेता अजय देवगण, अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांनी 'टोटल धमाल' उडवून द्यायाच चंगच बांधलाय... मग आता त्यांना कोण थांबवणार... काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर या व्हिडिओनं इंटरनेटवर धुमाकूळ घातला... अनिल-माधुरीचीही जोरदार चर्चा झाली. त्यानंतर सिनेमातलं 'पैसा ये पैसा' गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. हे एक रिमिक्स गाणं होतं. आता याच सिनेमातील आणखी एक रिमिक्स गाणं प्रदर्शित झालंय. 

१९७८ साली आलेल्या अभिनेत्री - डान्सर हेलन यांच्या 'मुंगडा' या गाण्याला पुन्हा एका नव्या स्वरुपात प्रेक्षकांसमोर आणण्यात आलंय... आणि या गाण्यात दिसतेय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा... तेही एकदम सेक्सी अवतारात... 

'टोटल धमाल' हा सिनेमा येत्या २२ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. कॉमेडी सिनेमाच्या चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे. कारण या सिनेमात अजय देवगन, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, जॉनी लिवर, अर्शद वारसी, जावेद जाफरी, रितेश देशमुख आणि संजय मिश्रा यांच्या मस्तीखोर भूमिका आहेत.