Sunny Deol : चित्रपटसृष्टीतील गेल्या अनेक वर्षांपासून असे चित्रपट बनवण्यात येत आहेत. ज्यात विलेन खूप भयानक दाखवण्यात येतात. अनेकांसोबत तो एका वेळी भांडताना दिसतो. त्याच्यासमोर कोणीही असलं तरी त्याचा काही परिणाम होत नाही. पण तुम्हाला माहितीये का 28 वर्षांपूर्वी आलेल्या अशाच एका चित्रपटात असे 7 खलनायक होते. त्यातही नेहमी प्रमाणेच एका पेक्षा दुसरा आणि दुसऱ्या पेक्षा मोठा तिसरा असे 7 खलनायक. सगळ्यात मोठा आणि 7 वा खलनायकाचे सगळ्यात शेवटी निधन होते. मात्र, यावेळी त्याच्यासमोर कोणता हीरो नाही तर एक छोटा मुलगा येतो. आता तो कोण आहे आणि तो हा चित्रपट कोणता आहे त्याविषयी जाणून घेऊया...
बॉलिवूडमध्ये 7 विलेन असलेल्या या चित्रपटानं सगळ्यानं वेड लावलं होतं. खरंतर, या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये जेव्हा खलनायकाच्या विरोधात एक छोटा मुलगा उभा राहतो तेव्हा जाऊन हीरोत उर्जा संचारते आणि तो त्या खलनायकाला हरवतो. 1996 मध्ये आलेल्या या चित्रपटाची आयएमडीबी रेटिंग ही 7.5 आहे. खरंतर या चित्रपटासाठी महत्त्वाची भूमिका ही कमल हासन यांना सगळ्यात आधी ऑफर करण्यात आली होती. पण कमल हासन यांनी या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आणि ही भूमिका नंतर सनी देओलला मिळाली. या चित्रपटात मीनाक्षी शेषाद्रिनं महत्त्वाची भूमिका साकारली होती. आता इतकी हिंट दिल्यावर तुम्हाला कल्पना आली असेल की हा चित्रपट कोणता असेल. तर या चित्रपटाचं नाव 'घातकः लीथल' आहे. यात डॅनी डेन्जोंगपा यांनी या चित्रपटात सगळ्यात मोठ्या खलनायकाची भूमिका साकारली होती.
हेही वाचा : तुम्हाला माहितीये 'Nimbooda-Nimbooda' गाण्याचा अर्थ? 99% लोकांना माहितही नाही
यात दाखवण्यात आलं की लोकांना मारून ते त्यांना वाघाच्या पिंजऱ्यात टाकायचे. त्यांना काही ठिकाणं जप्त करायची जिथे इतरांची आधी पासून दुकानं होती. चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर त्यानं यात काशीची भूमिका साकारली होती. तर चित्रपटात दाखवलं आहे की त्यापैकी एक दुकान हे काशीच्या भावाचं असतं. खलनायक त्याचा आणि काशीचे वडील अर्थात अमरीश पुरी यांची देखील हत्या करतो. तर या सगळ्याचा काशी बदला कसा घेतो ते दाखवण्यात आलं आहे.