दयाशंकर मिश्र : तुम्ही जगातलं सर्वोत्तम फळ असाल, पण तरीही काही लोक असे असतील की त्यांना या सर्वोत्तम फळावर प्रेम नसेल. या फळाचा आस्वाद न घेताच, ते या फळावर टीका करतील, तिरस्कार करत जीवन जगतील. दुसरीकडे असे लोक जे खूप चांगले आहेत, अशा लोकांमुळे त्यांचा मूड खराब होऊ शकतो. मग तुम्हाला कुणी दुखावू शकतं, म्हणून तुमच्या मनाच्या आत हा निश्चय केला पाहिजे की, माझ्या परवानगीशिवाय मला कुणीच दु:खी करू शकत नाही.
आपला मीडिया खरं पाहिलं तर, अशा बातम्यांनी भरलेला आहे. ज्यात कुणाच्या दु:खाचं कारण, तो कुणा इतर व्यक्तीपेक्षा स्वत: आहे. अशा घटनांमध्ये आपण दुसऱ्याची प्रगती, मित्र पुढे गेल्याचा आकस, आपल्या मुलांची, दुसऱ्या मुलांशी तुलना, आणि त्याच गोष्टींच्या मागे लागून, काही तरी मिळवण्याची इच्छा, आणि मग या तणावाचा अंत आत्महत्येपर्यंत जातो. आत्महत्या या विषयावर काम करणाऱ्या तज्ञांच्या मते, आत्महत्या करण्याचा विचार सर्वात आधी मनात जन्म घेतो. मनात हा विचार घरं करतो. या इच्छेला बाहेरून जेव्हा 'आहार' मिळतो, तेव्हा तो विचार आणखी घातक होतो. काही प्रकरणात आत्महत्येचं कारण क्षणिक मानलं जातं. या विचाराच्या मुळापासून व्यक्ती स्वत: अति भावनिक, आणि अति संवेदनशील अशा गोष्टींना सहन करण्यात असक्षम होत जातो.
हेच कारण आहे की ऑलिम्पिकमध्ये आमच्या सारख्या मोठ्या देशाच्या तुलनेत, इतर लहान देश अधिक चांगलं प्रदर्शन करतात. कारण जेवढ्या सुविधा असतात, तेवढाच मनाचं निश्चय देखील असला पाहिजे. तेवढंच महत्वाचं असतं स्वत:ला सांभाळून ठेवणे. तेव्हा जगातले लोक आपल्यापासून दूर पळतात आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीवर टोमणा मारतात. एक नागरिक म्हणून आपण अतिभावूक आणि लहान गोष्टींवरून नाराज होणारे लोक आहोत. लहान गोष्टींवरून आपल्या भावना दुखावतात. यात नुकसान कुणाचं होतं, स्वत: आमचं आणि आमच्यावर प्रेम करणाऱ्यांचं. अशा लोकांचं ज्यांच्यावर आपण जीवापासून प्रेम करतो, ज्यांच्यासाठी स्वप्न पाहतो, अशाच लोकांना अधिक नुकसान होतं. म्हणून जीवन प्रिय बनवण्याच्या दिशेने पाऊल टाका. कोणत्या गोष्टीवर नाराज, दु:खी होण्याआधी जरूर विचार करा की, दुसऱ्याच्या राग, कमजोर लहान मनाची माणसं यांची शिक्षा आपल्याला दिली जात आहे. दुसऱ्यापासून नाराज होण्याचं जेवढं नुकसान स्वत:ला आहे, तेवढं त्यालाही नाही, जो आपल्याला नाराज आणि दु:खी करतो.
गीतकार बॉब मार्ले यांनी किती सुंदर गोष्ट सांगितली आहे. 'सत्य तर हेच आहे की, प्रत्येक जण तुम्हाला दुखवणार, तुम्ही तर फक्त एवढं पाहा, की असा कोण आहे, ज्याच्यासाठी कष्ट सहन करणे सार्थक असेल'. मार्लेची गोष्ट अंतरंगात उतरवली तर जीवनातील अनेक गोष्टी स्पष्ट होतील. तुम्ही जिथं पर्यंत पाहू शकाल, त्यापेक्षाही आणखी दूरदृष्टीकोन तुमच्याकडे येईल. प्रत्येक गोष्टीने दु:खी होणं, अशा गोष्टींमुळे नाराज होणं, ज्यावर आपलं नियंत्रण नाही. दुसऱ्यांच्या मूर्खपणामुळे स्वत:ला क्रूर शिक्षा देऊ नका.
तुम्हाला अनेक वेळा लक्षात आलं असेल की, लोक फक्त तक्रारी करतात, आणि तुमचा संपूर्ण दिवस खराब जातो. हे काय आहे, अशी कशी कुणाला एवढी परवानगी द्यावी, की तो आपल्या शांत आणि सौम्य दिवसाला एका झटक्यात अस्वस्थ करून टाकेल. हा अस्वस्थतेचा पूर आपल्याला प्रभावित करतो. जीवनाचं धैर्य आणि सुख पुसून टाकतो. यासाठी आपल्याला आंतरिक शांती आणि संतुलनाच्या दिशेने सर्वाधिक काम करण्याची गरज आहे. ही कला आपल्याला शिकवेल की जीवन दुसऱ्यांसोबत राहूनही, त्याच्या नको त्या प्रभावापासून प्रभावित न होता कसं जगता येईल.
(लेखक 'झी न्यूज'चे डिजिटल एडिटर आहेत )
(https://twitter.com/dayashankarmi)
(तुमचे प्रश्न आणि सूचना इनबॉक्समध्ये लिहा : https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)