कोरोनावरील उपचारांमध्ये हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा वापर थांबवा; WHO चा इशारा

यामागे कारण आहे.... 

Updated: May 26, 2020, 09:21 AM IST
कोरोनावरील उपचारांमध्ये हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा वापर थांबवा; WHO चा इशारा  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO ने मलेरियावर उपचार म्हणून वापरण्यात येणाऱ्या हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या गोळ्यांचा वापर Coronavirus कोरोनासाठीच्या उपचारांमध्ये करु नये असा इशारा दिला आहे. या औषधामुळे कोरोनावर प्रभावित परिणाम दिसून येता असा कोणताही पुरावा नसल्याचं म्हणत हा इशारा देण्यात आला आहे. आयसीएमआरकडूनही याला दुजोरा देण्यात आल्याचं कळत आहे. 

हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या वापरामुळे कोरोना रुग्णांच्या हृदयावर परिणाम होत असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय त्यामुळे मृत्यूदारतही काही प्रमाणात वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच या औषधाचा वापर तातडीने थांबवण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे. 

hydroxychloroquineची कार्यक्षमता आणि सुरक्षितता याबाबत महत्त्वाचे पुरावे हाती असणं तितकंच महत्त्वाचं असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेशी संलग्न संशोधक सौम्या स्वामीनाथन यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली. 

 

सूर्याचा दाह कमी होणार; धुळीचं वादळ आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज 

 

मार्च महिन्यात hydroxychloroquine या औषधाचा कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी वापर करण्यात येत असल्याची बाब समोर आली होती. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेसुद्धा कोरोनापासून बचावासाठी hydroxychloroquineचा वापर करत असल्याचं म्हटलं गेलं होतं. किंबहुना त्यांनीही या औषधाचा उल्लेख केला होता. त्यामुळे जागतिक स्तरावर एकाएकी मलेरियावरील उपचारांत वापरल्या जाणाऱ्या hydroxychloroquine या औषधाविषयीची चर्चा झाली होती. पण, आता मात्र जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आलेला इशारा पाहता कोरोनावर hydroxychloroquine हा प्रभावी उपाय नसल्याचंच सिद्ध होत आहे.