Couple Yoga Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका रुममध्ये अनेक कपल एकमेकांना मिठी मारुन बसलेले दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. प्रथमदर्शी हा व्हिडीओ पाहिल्यावर नेटकरी गोंधळत आहेत. पण हा प्रकारचा योगा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा कुठला योगासनाचा प्रकार आहे. योग हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. गेल्या काही वर्षांमध्ये योगा करण्यावर जगभरात प्राधान्य देण्यात येतं आहे. निरोगी आरोग्याचं मूलमंत्र योगा मानला जातो आहे. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील हा योगा कुठल्या प्रकारचा आहे. (What is this Yogasana of hugging each other everyone has one question Pregnant couple yoga video viral on social media)
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये अनेक लोक आपल्या पार्टनरसोबत योगा करताना तुम्ही पाहू शकता. हा व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना विविध प्रकारचे प्रश्न विचारताना दित आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @dhakadgirl8 नावाच्या युजरने शेअर केल्यानंतर इतर प्लॅटफॉर्मवर वाऱ्यासारखा पसरतोय. हा व्हिडीओ शेअर करताना यूजरने लिहिलंय की, 'कोणी सांगू शकेल का हा कोणत्या प्रकारचा योग आहे?' या व्हिडीओला आतापर्यंत 4 लाखांहून अधिक यूजर्सने शेअर केला आहे. त्याच वेळी, लोक सतत पोस्टवर असंख्य प्रतिक्रिया करत आहेत. तर लोकांनाही हा व्हिडीओ खूप पसंत करत आहेत.
What kind of yoga is this?? pic.twitter.com/xCh2PzCgNz
— Priyanka dhakad (@dhakadgirl8) December 12, 2023
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर लोक कमेंट्सचा पाऊस पडतोय. एका यूजरने लिहिलंय की, 'हा कसला योग आहे?' दुसऱ्या यूजरने म्हटलंय की, 'आजच्या आधी या योगाबद्दल कधीच ऐकलं नाहीय.' त्याचवेळी एका यूजरने 'काश मी सिंगल नसतो..' अशा प्रकारचे कमेंट्स केले आहेत.
आम्ही तुम्हाला सांगतो हा कुठल्या प्रकारचा योगा आहे ते. व्हिडीओमध्ये तुम्ही जो योगा पाहत आहे त्याला Pregnant couple yoga असं म्हटलं जातं. हा योगा खास करुन परदेशात पाहिला जातो. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील मोठ्या मोठ्या शहरांमध्ये Pregnant couple yoga चे क्लास घेतले जातात. ज्यामध्ये गर्भवती महिलांसोबत त्यांचे पार्टनर या योगा क्लासमध्ये येतात. जिथे त्यांना आपल्या गर्भवती बायकोला कशाप्रकारे मानसिक आणि शारीरिकरित्या योगाच्या माध्यमातून सांभाळलं पाहिजे हे शिकवलं जातं. या कपल योगाचा गर्भवती महिलांना अतिशय फायदा होतो.