मुंबई : आपण हे नेहमी ऐकतो की, प्रेम हे आंधळं असतं, ते वय, जात, लहान, मोठं काहीच पाहात नाही. ज्यामुळे लोकं वेगळ्या जातीच्या जोडीदाराशी लग्न करतात. त्याचप्रमाणे तुम्ही वयात जास्त अंतर असून देखील लग्न केलेल्या कथा देखील तुम्ही ऐकल्या असणार. परंतु आज आम्ही तुम्हाला अशी एक कहाणी सांगणार आहोत जी, ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण एका 7 मुलांच्या आईने आपल्या मुलाच्या मित्रांसोबतच लग्न केलं आहे.
मर्लिन बटिगिएग असे या महिलेचं नाव आहे, तिने स्वतः देखील ही कल्पना केली नव्हती की, तिच्या मुलाचा मित्र, ज्याला ती व्हिडिओ गेम खेळण्यासाठी घरी आणायला नकार द्यायची, तोच तिचा जीवनसाथी बनेल.
आपल्या मुलाचा मित्र विल्यम स्मिथच्या प्रेमात पडलेल्या मर्लिनने तिच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या व्यक्तीशी लग्न तर केलं परंतु त्यानंतर तिला संपूर्ण जगाचे टोमणे ऐकावे लागले. या जोडप्याच्या लग्नाला आता 12 वर्षे पूर्ण झाली आहेत.
मर्लिन त्यावेळी 35 वर्षांची होती आणि ती आपल्या मुलांसोबत वेस्ट ससेक्सच्या क्रोली येथे राहत होती. तेव्हा तिच्या मुलाचा 16 वर्षीय मित्र विल्यमने तिला घरातील कामात मदत करण्यासाठी मदत केली. खरेतर त्यावेळेला मर्लिन मसल पेनच्या आजाराने त्रस्त होती. त्यावेळेला एकमेकांना मदत करता करता मर्लिन आणि विल्यम एकमेकांकडे आकर्षित झाले.
मर्लिने सांगितले की, दोघांच्या या निर्णयाने कुटुंबियांना धक्का बसला होता. परंतु मर्लिनच्या कुटुंबीयांनी त्यांचे मैत्रीच्या नात्याला समजून घेतले, कारण विल्यम तिला खूप मदत करत होता. साफसफाईचा व्यवसाय करणारी मर्लिन म्हणते की, मला विल्यमच्या आयुष्यातून जायचे नव्हते आणि तिला दुसरे मुल देखील नको हवे होते.
व्यवसायाने एक चित्रपट निर्माता असलेला विल्यम म्हणतो, "मला माहित होते की आमच्यामध्ये काहीतरी विशेष आहे. ती माझी ड्रीम वुमन होती आणि अजूनही आहे."
या नवीन नात्यानंतर हे जोडपे लवकरच एकत्र राहू लागले. या नात्यामुळे, मर्लिनच्या मुलांपैकी एका मुलाने तिच्याशी संबंध तोडले आणि विल्यमच्या कुटुंबानेही तिच्याशी बोलणे बंद केले परंतु या जोडप्याने सांगितले की, आम्ही अजूनही आनंदी आहोत.
या जोडप्याने फेब्रुवारी 2009 मध्ये लग्न केले, ते हनीमूनला देखील गेले. त्यांच्या लग्नाला आता 12 वर्षे झाली आहेत, परंतु ते 15 वर्षांपासून एकत्र राहत आहेत. इतक्या वर्षांनंतरही, विल्यम आणि मर्लिन यांना लोकांची टीका सहन करावी लागली आहे. मर्लिन म्हणते, 'लोक आमच्याकडे टक लावून पाहतात पण आम्हाला आमच्या नात्याचा अभिमान आहे.'
आता हे जोडपे त्यांच्या या प्रेमकथेवर चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे. यासाठी ते पैसे गोळा करत आहेत. मर्लिन म्हणते, 'मला वाटते की, लोकांची विचारसरणी बदलण्याची गरज आहे. विल्यमपेक्षा इतर कोणीही माझ्यावर इतकं जास्त प्रेम करु शकणार नाही. माझा त्याच्यावर विश्वास आहे.'