आकाशात साजरा करा 'व्हॅलेंटाईन डे', कपल्ससाठी लव क्लाऊड पाहा काय आहे ऑफर?

आकाशात तुमच्या व्हॅलेंटाईनसोबत करा खास रोमांन्स... पाहा कुठे आणि ही खास ऑफर? 

Updated: Feb 12, 2022, 08:34 PM IST
आकाशात साजरा करा 'व्हॅलेंटाईन डे', कपल्ससाठी लव क्लाऊड पाहा काय आहे ऑफर? title=

वॉशिंग्टन : व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमवीरांसाठी खास असाच दिवस. या स्पेशल दिवसाची अनेकजण वर्षभर आतुरतेनं वाट पाहत असतात. हा दिवस प्रेमी युगुलांच्या कायमस्वरूपी आठवणीत राहावा यासाठी अमेरिकेतल्या एका एअरलाईन्स कंपनीनं हटके ऑफर दिली.

ही ऑफर वाचल्यानंतर प्रेमवीरांना आपल्या साथीदारासोबतचा व्हॅलेंटाईन डे खास व्हावा असंच वाटेल. फेब्रुवारी महिना म्हंटला की प्रेमी जोडप्यांसाठी आनंदाचे दिवस असतो. वेगवेगळ्या डेजच्या माध्यमातून आपलं प्रेम व्यक्त करायचं आणि व्हॅलेंटाईन डे म्हंटला की त्या आनंदाला पारावरच उरत नाही.

याच व्हॅलेंटाईन डेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अमेरिकेच्या लॉस वेगास शहरात एका एअरलाईन्स कंपनीनं कपल्ससाठी खास सुविधा उपलब्ध करून दिली. ज्यांना आपल्या पार्टनरसोबत प्रायव्हसी हवीय आणि व्हॅलेंटाईन डेचा हटके आनंद घ्यायचाय अशांसाठी ही ऑफर म्हणजे स्वर्गसुखच म्हणावं लागेल. 

या कंपनीनं कपल्ससाठी 45 मिनिटांची फाईंग राईड सेवा उपलब्ध करून दिलीय. या काळात विमानात फक्त कपल्स आणि कॉकपिटमधील वैमानिक यांच्याव्यतिरिक्त कुणीही असत नाही. लॉस वेगासमधून हे विमान उडतं आणि आकाशात 45 मिनिटं सुरू होतो कपल्सचा रोमँन्टिक प्रवास.

विमानात कपल्सना स्वर्गाची अनुभूती घेता यावी यासाठी खास सुविधा देण्यात आली आहे. पलंगावर लाल रंगाच्या उशा ठेवण्यात आल्या आहेत. एका पडद्याच्या सहाय्यानं पायलट आणि कपल्स यांना वेगळं करण्यात आलंय. शॅम्पेनशिवाय विमानात कुठल्याही प्रकारे दारु वितरित केली जात नाही.

अमेरिकेच्या लव क्लाइड या एअरलाईन कंपनीनं हा अनोखा प्लॅन आणला आहे. सध्या बदलत्या काळानुसार, घटस्फोटांचं प्रमाण वाढलं आहे, मात्र आमची कंपनी लग्नाचं नातं वाचवण्याचं काम करते असा दावा कंपनीनं केला. 

तुम्हाला ही अनोखी राईट करून आपल्या पार्टनरला खूश करायचं असेल तर या अनोख्या प्लॅनसाठी 995 डॉलर म्हणजेच जवळपास 74 हजार रुपये भरावे लागतील. कंपनीनं विमानात लग्न करण्याचा पर्यायही दिलाय. एअरलाइन्सनं या सुविधेसाठी 417 विमानं घेतली आहेत. 

ज्यांना ग्रुपने जायचंय अशांसाठीही वेगळा प्लॅन देण्यात आला आहे. आता तुम्हाला तुमचा व्हॅलेंटाईन डे आठवणीत राहावा असं वाटत असेल तर या अनोख्या फ्लाईंग राईडची सफर करायला काहीच हरकत नाही. अर्थात त्यासाठी तुम्हाला अमेरिकेत जावं लागणार आहे.