सीरिया : रशियाच्या सैन्याने जगातील सर्वात खतरनाक दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटच्या टॉप कमांडर्सवर 'फादर ऑफ ऑल बॉम्ब' ने हल्ला केला आहे.
रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की व्लादिमीर पुतीनच्या सेनेने सीरियाच्या पूर्वेला असलेल्या अल-जोर शहरात इस्लामिक स्टेटच्या नेत्यांवर सर्वात मोठा गैर अण्विक बॉम्ब टाकला आहे.
यापूर्वी रशियाने ८ सप्टेंबरला सीरियामध्ये इस्लामिक स्टेटच्या चार मुख्य कमांडरला मारण्याचा दावा केला होता. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांच्या सैन्याने सीरियाच्या अल-जोर शहरावर हल्ला केला. या हवाई हल्ल्यात इस्लामिक स्टेटचे चार नेता ठार झाले आहेत.
रशियाच्या न्यूज एजन्सीने संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने सांगितले की या हल्ल्यात ४० दहशतवादी ठार झाले आहेत. यात दहशतवादी नेता अबू मुहम्मद अल-शिमाली आणि मुलमुरोद खलीमोव सामील आहेत.