लैंगिक समानता मंत्री साधं केळी पाहिलं की थरथर कापते; काय आहे मागील कारण?

केळीचं सेवन हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानलं जातं. पण केंद्रीय महिला मंत्री त्या केळी पाहिल्यानंतर अस्वस्थ होतात. त्यामागील कारण जाणून तुम्ही हैराण व्हाल. 

नेहा चौधरी | Updated: Nov 17, 2024, 04:35 PM IST
लैंगिक समानता मंत्री साधं केळी पाहिलं की थरथर कापते; काय आहे मागील कारण? title=
Minister of Gender Equality shivers when he sees a simple banana What is the reason behind

खरं तर आपल्या प्रत्येकाला कसली ना कसली भीती वाटत असते. कुणाला अंधाराची, तर कुणाला बंद लिफ्ट अगदी झुरळ, पालीचीही भीती वाटणारी माणसं आपल्या आजूबाजूला आपण पाहिली आहे. पण तुम्ही कधी ऐकलं आहे किंवा बघितलं का, की फळांची आणि तेही केळी सारख्या फळाची कोणाला भीती वाटू शकते. तर हो, लैंगिक समानता मंत्री महिला आहेत, त्यांना केळी दिसलं की त्या अस्वस्थ होतात. जे जरी आश्चर्यचकित गोष्ट असली तरी यामागील कारणही तसंच आहे. 

आम्ही बोलत आहोत, स्वीडनच्या लैंगिक समानता मंत्री पॉलिना ब्रँडबर्ग यांच्याबद्दल. या केळं खाणे सोडा केळंच नाव घेतलं तरी त्या अस्वस्थ आणि बेचैन होतात. त्यामुळे त्यांना नजरेसमोर केळं येऊ नये म्हणून खूप काळजी घेतली जाते. कारण केळं दिसलं की त्या थरथर कापतात. एका महिला मंत्रीला अशा विचित्र गोष्टीची भीती वाटणे हे अतिशय थक्क करणारी गोष्ट आहे. पण यामागील कारणही अतिशय महत्त्वाचं आहे. 

याला म्हणतात बनाना फोबिया!

हो, खुद्द पॉलिना यांनी एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 2020 मध्ये तिला बनाना फोबियाबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. खरं तर ती पोस्ट काही दिवसांनी डिलीट करण्यात आली होती. पण या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, त्यांना बनाना फोबिया आहे म्हणजे त्यांना केळाचं नाव घेतली तरी भीती वाटते. 

त्याशिवाय ही गोष्ट अशा प्रकारे लिक झाली की, एक्स्प्रेसन या स्थानिक मीडिया आउटलेटच्या हाती एक इमेल्स लागलं. त्यात मंत्री पॉलिना यांच्या व्हीआयपी लंचबाबत सूचना देण्यात आल्या होता. त्याशिवाय त्यांच्या अधिकृत दौऱ्यादरम्यान त्या जिथे जिथे जातील तेथील कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलंय होतं की, त्यांना केळी दिसणार नाही याची व्यवस्था करावी. 

 

हेसुद्धा वाचा - 12160915800 रुपयांची लॉटरी लागल्यानंतर तिने पहिल्यांदा काय विकत घेतलं पाहिलं का? वाचून व्हाल थक्क

 

का आहे त्यांना बनाना फोबिया?

मंत्री पॉलिना यांनीही एक्स्प्रेसनला त्यांच्या फोबियाबद्दल सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं की, ही एक भीती असून एखाद्या अ‍ॅलर्जीसारखा हा आजार असतो. यासाठी वैद्यकीय मदतही घ्यावी लागते. खरं तर अशा प्रकारची भीती बसण्यामागील कारण अजून डॉक्टरांनाही माहिती नाही. मात्र बालपणी कुठल्या घटना किंवा अनुभवानंतर ही भीती बसू शकते, असा डॉक्टरांचा अंदाज आहे.