International Airports Around The World : जगाच्या कानाकोपऱ्यात जलद गतीने प्रवास करायचा असेल तर हवाई मार्ग हा सर्वोत्तम मार्ग आहे. जगातील अनेक देश मोठ्या संख्येने विमानतळांची निर्मीती करत आहे. मात्र, जगात एक देश असा आहे जिथे तब्बल 15,873 विमानतळं आहेत. तर, जगातील अनेक देशांमध्ये 10 हजार पेक्षा जास्त विमानतंळ आहेत. जाणून घेऊया हे देश कोणते.
भारतात देखील मोठ्या संख्येने नविन विमानतळं निर्माण केली जात आहेत. भारतामध्ये एकूण 137 विमानतळ आहेत. यापैकी 34 आंतरराष्ट्रीय विमानतळ, 10 सीमाशुल्क विमानतळ, 81 देशांतर्गत विमानतळ आणि 23 संरक्षण हवाई क्षेत्रे विमानतळांचा समावेश आहे. मात्र, जगातील अनेक देशांमध्ये 10 हजार पेक्षा जास्त विमानतंळ आहेत. या देशांसमोर भारतातील विमानतळांची संख्या ही इतर देशांच्या फक्त 1.3 टक्के इतकी आहे.
कोणत्याही देशातील विमानतळांचे नेटवर्क हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. विमानतळं ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पर्यटन तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेशी जोडलेले आहेत. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया यासारख्या अनेक देशांमध्ये 10 हजार पेक्षा जास्त विमानतळं आहेत.
सर्वाधिक विमानतळांच्या यादीत कॅनडा पाचव्या स्थानावर आहे. कॅनडामध्ये 1,425 विमानतळं आहेत. युनायटेड किंगडम सहाव्या स्थानावर असून या देशात 1,043 विमानतळं आहेत. रशिया सातव्या स्थानावर आहे. रशियात 904 विमानतळ आहेत. जर्मनी आठव्या स्थानावर आहे. जर्मनीत 838 विमानतळं आहेत. अर्जेंटिना नवव्या स्थानावर असून इथं 756 विमानतळं आहेत. दहाव्या स्थानावर फ्रान्स आहे. फ्रान्समध्ये 689 विमानतळं आहेत.
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जागातील एकमेव देश आहे जिथे तब्बल 15,873 विमानतळं आहेत. सर्वाधिक विमानतळांच्या यादीत ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथील विमानतळांची एकूण संख्या 4,919 इतकी आहे. सर्वाधिक विमानतळांच्या यादीत ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियात 2,180 विमानतळं आहेत. सर्वाधिक विमानतळांच्या यादीत मेक्सिको चौथ्या क्रमांकावर आहे. मेक्सिकोमध्ये 1,485 विमानतळं आहेत.