Pakistan Blast: पाकिस्तानात ट्रेनमध्ये स्फोट; प्रवाशांची धावपळ

Pakistan Blast: पाकिस्तानात ट्रेनमध्ये सिलेंडर ब्लास्ट झाल्याने खळबळ माजली आहे. या स्फोटात दोन ठार झाले असून चौघे जखमी झाले आहेत.   

Updated: Feb 16, 2023, 01:15 PM IST
Pakistan Blast: पाकिस्तानात ट्रेनमध्ये स्फोट; प्रवाशांची धावपळ  title=

Pakistan Blast: पाकिस्तानात ट्रेनमध्ये सिलेंडर फुटल्याने दोनजण ठार झाले असून चौघे जखमी झाले आहेत. गुरुवारी दुपारी क्वेट्टाला (Quetta) निघालेल्या जाफर एक्स्प्रेसमध्ये (Jaffer Express) हा स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन Chichawatni रेल्वे स्थानकातून जात असताना हा स्फोट झाला. स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार, ही ट्रेन पेशावर (Peshawar) येथून आली होती. स्फोटानंतर (Blast) ट्रेनमध्ये प्रवाशांची एकच धावपळ सुरु झाली होती. 

ट्रेनच्या बोगी नंबर 4 मध्ये हा स्फोट झाल्याचा माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी रेल्वे प्रवक्त्यांच्या हवाल्याने दिली आहे. प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशी सिलेंडर वॉशरुमजवळ घेऊन गेला होता. याच सिलेंडरचा स्फोट झाला. दरम्यान, स्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि रेल्वे ट्रॅक बंद करुन टाकला. 

स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार, पोलीस आणि दहशतवादी विरोधी पथकाचे अधिकारी घटनास्थळावरुन पुरावे गोळा करत आहेत. पेशावरमध्ये मशिदीत झालेल्या स्फोटाच्या काही दिवसांनी हा स्फोट झाला आहे. पेशावरमध्ये मशिदीत लोक प्रार्थनेसाठी जमले असताना झालेल्या स्फोटात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

30 जानेवारीला हा स्फोट झाला होता. आत्मघाती हल्लेखोर पोलिसाच्या वेषात कडक सुरक्षाव्यवस्था भेदत दुचाकीवरुन मशिदीत गेला होता.