#ChristchurchMosqueAttack : आम्हाला अल्लाहने वाचवलं; बांग्लादेशी कर्णधाराची प्रतिक्रिया

हा असा प्रसंगा पुन्हा ओढावला जाऊ नये

Updated: Mar 15, 2019, 10:22 AM IST
#ChristchurchMosqueAttack : आम्हाला अल्लाहने  वाचवलं; बांग्लादेशी कर्णधाराची प्रतिक्रिया   title=

क्राईस्टचर्च : न्यूझीलंड क्रिकेट संघासोबत सुरु असणाऱ्या मावलिकेच्या निमित्ताने सध्या बांग्लादेशचा क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यावर होता. पण, या दौऱ्यादरम्यानच शुक्रवारी स्थानिक प्रमाणवेळेनुसार दुपारी झालेल्या अंदाधुंद गोळीबारातून हा संघ थोडक्यात बचावला आहे. बांग्लादेश क्रिकेट संघाचे खेळाडू बसमध्ये बसलेले असताना ती बस मशिदीमध्ये जाणार होती. पण, हे संकट टळलं अशी माहिती समोर येत आहे. या जीवघेण्या प्रसंगातून कसेबसे वाचलो, अशी प्रतिक्रिया क्रिकेट संघाकडून देण्यात येत आहे. 

'अल्हमदुलिल्लाह अल्लाहमुळेच आम्ही वाचलो. आम्ही स्वत:ला फारच नशीबवान समजतो. हा असा प्रसंगा पुन्हा ओढावला जाऊ नये, असंच मला वाटतं. आमच्यासाठी प्रार्थना करा' असं बांग्लादेश कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार मुशफिकर रहिमने म्हटल्याचं ट्विट करण्यात आलं आहे. बांगलादेश क्रिकेट संघातील फंलदाज तमिम इक्बाल याने ट्विट करत, गोळीबारातून संपूर्ण संघ बचावला असून हा अत्यंत भीतीदायक अनुभव असल्याचं स्पष्ट केलं. 

न्यूझीलंडच्या पंतप्रधानांकडून या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. न्यूझीलंडच्या इतिहासातील हा एक काळा दिवस असल्याचं म्हणत हल्लेखोराविषयी फार माहिती हाती आली नसल्याचं Jacinda Ardren यांनी स्पष्ट केलं. 

न्यूझीलंडच्या क्राईस्टचर्च शहरातील एका मशिदीत शुक्रवारी गोळीबार झाल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, ही मशीद क्राईस्टचर्च शहराच्या मध्यवर्ती भागातच आहे. मशिदीत अचानकपणे सुरु झालेल्या गोळीबारामध्ये अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. हल्ल्यातील मृतांचा आकडा मात्र अद्यापही उघड करण्यात आलेला नाही. दरम्यान हल्ल्याच्या या पार्श्वभूमीवर न्यूझीलंड आणि बांग्लादेश यांच्यात Hagley Oval येथे होणारा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडूनही या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे.